News Flash

घर खरेदी करताना..

तुम्ही घेत असलेल्या कर्जाच्या रकमेचे निर्धारण तुमच्या उत्पन्नाद्वारे केले जाते.

घरखरेदी करण्याची प्रक्रिया अतिशय संभ्रमित करणारी आणि वेळ घेणारी आहे, असा विचार ग्राहक बरेचदा करत असतो. रियल इस्टेटच्या संदर्भात प्रत्येक वेळी हेच वास्तव असतेच असे नाही. त्यामुळे घरखरेदी करणाऱ्यांना त्यांचे जीवन सुलभ बनवण्यासाठी घर खरेदी-विक्रीमधील वास्तव आणि घरखरेदी करण्याच्या प्रक्रियांना समजून घेणे महत्त्वाचे आहे.

तुम्ही घेत असलेल्या कर्जाच्या रकमेचे निर्धारण तुमच्या उत्पन्नाद्वारे केले जाते. तुम्ही घेत असलेल्या कर्जाच्या रकमेत उत्पन्न हा महत्त्वपूर्ण घटक असला तरीही तो एकमेव घटक नसतो. तुमच्या देयाला तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त प्रमाणात विचारात घेतले जाते. उदा. जरी तुम्ही वर्षांला ६ लाख कमवत असलात, आणि जर तुमच्या क्रेडिट कार्डचे देय बरेच असेल तर जरी तुम्ही ४ लाख कमवत असाल आणि तुमच्यावर अजिबात देय नसण्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला कदाचित कर्जाची कमी रक्कम मिळू शकते. कर्जाच्या प्रक्रियेमध्ये कर्ज देताना आणि ईएमआय मोजताना अशा प्रकारचे सर्व घटक विचारात घेतले जातात.

खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती?

गृह बाजारपेठा चढ आणि उतारांमधून जात असतात. परंतु मालमत्ता खरेदी करण्याची योग्य अशी वेळ नसते, कारण किमतींमध्ये नेहमी वाढ होण्याकडेच कल असतो. जर व्यवहार फारच आकर्षक वाटत असेल तर तुम्ही खात्रीने तो पूर्ण करण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाहीत.

रियल इस्टेटच्या किमती कधीच कमी होत नाहीत!

रियल इस्टेटच्या किमती कधीच कमी होत नाहीत.  मालमत्तेची किंमत मंदीच्या तुलनेमध्ये वाढत नाही, पण याचा अर्थ ती पडेल किंवा खाली येईल असा होत नाही.

व्याज दरामध्ये वाढ म्हणजेच ईएमआयमध्ये वाढ :

कर्जदारांची वर जात असलेल्या बँक बेस रेटवरची (बेस रेट आरबीआयने बँकेसाठी सुनिश्चित केलेला मापदंड आहे, ज्याच्या खाली ते त्यांचे व्याज दर ठरवू  शकत नाहीत) आणि त्याचा परिणाम म्हणून होणाऱ्या गृहकर्जाच्या वाढत्या दरावरील तात्काळ प्रतिक्रिया म्हणजे त्यामुळे त्यांचे ईएमआय वाढू शकतात, जे त्यांच्या मासिक हप्त्यांमध्ये तणावाची भावना निर्माण करते आणि परिणामत: त्यांच्या मासिक हप्त्यांमध्ये ताण निर्माण होतो.

हे खास करून दर मजबूत होत असतानाचे सर्वात मोठे तथ्य आहे. वास्तवात, बहुतांश बँका, अटींच्या अधीन राहून सामान्यत: कर्जाचा कालावधी वाढवतात आणि ईएमआयची रक्कम तेवढीच राहते. व्याज दराच्या चक्रावर, लागू होणाऱ्या व्याज दरामध्ये बदल होण्यासोबत कालावधी बदलतो. परंतु हा निर्णय कर्जदाराचे वय, मालमत्ता, उत्पन्न, इ. बाबींवर अवलंबून असतो.

मुळात कालावधीमध्ये विस्तार होतो आणि ईएमआयच्या रकमेवर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे जरी तुम्हाला कर्जाचा परतावा पुढे वाढवण्याची इच्छा नसेल, तर तुम्ही बँकेला उच्च ईएमआय सेवेबद्दलच्या तुमच्या इच्छेची सूचना देणे आवश्यक असते.

जर व्यक्तीने त्याचे कर्ज दुसऱ्या बँकेत स्थानांतरित केले तर त्याला पहिल्यापासून परतावा सुरू करावा लागतो.

हा एक मोठा गैरसमज आहे ज्यामुळे व्यक्ती दुसऱ्या बँकेकडून सुधारित उत्पादनाच्या लाभ घेण्याची संधी असूनसुद्धा त्याच बँकेकडे राहणे पसंत करतात. व्यक्तीने त्याच्या गरजेसाठी साजेसे असलेले उत्पादन मिळत असल्यास त्याचा लाभ घेण्यासाठी त्याने बँक बदलावी, असा सल्ला दिला जातो. त्याला परत पहिल्यापासून कर्जाची परतफेड करावी लागेल हा गैरसमज आहे.

नवीन बँकेला अमॉटिझेशन शेडय़ुल (जे मूळ रक्कम आणि व्याज यांचे विवरण असते) तयार करावे लागते, जे दरामध्ये बदल झाल्याच्या स्थितीत तुमची वर्तमान बँक देखील तयार करते. बँक बदलते वेळी मूळ रक्कम तीच राहते; केवळ व्याज हा घटक कमी होतो, ज्यामुळे बरीच बचत होते.

 युनिट हेड- माला, एएचएफसीएल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:13 am

Web Title: process of buying a home precautions before purchasing property
Next Stories
1 मैत्र.. : स्वयंपाक घराशी!
2 सध्यातरी व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमीच!
3 कर्जत पट्टा: निसर्गाच्या कुशीतला मुंबईजवळचा उत्तम पर्याय
Just Now!
X