प्राची पाठक

सगळ्या प्रवासी बॅगांचे डिझाइन कसे असते यासाठी त्या बागा समोर ठेवून नीट बघा. त्यांना कुठे आणि कसे कप्पे शिवलेले असतात. कोणते भाग आत असतात, कोणते बाहेर ते बघा. बाहेरच्या कप्प्यांना जाडी दिलेली असेल तर जास्त सामान बसते. तसे नसेल तर सपाट उभ्या-आडव्या वस्तू त्यात नीट बसतात. बॅग हातात उचलायची आहे की खांद्यावर घ्यायची की पाठीला लावायची, यानुसारसुद्धा बॅगांचे डिझाइन्स आणि सोयी बदलतात. हातात उचलायच्या बॅगा, खांद्याला लावायच्या बॅगा यांना आजकाल व्हील्स येतात. पण ते सेटिंग्स तुम्ही कसेही वापरले- जर ते कितीही चांगले उत्पादन असेल तर तुटणारच. चाकांच्या बॅगांना ओढण्यासाठी जे आत फोल्ड होणारे मेटल अथवा प्लास्टिकचे भाग असतात, त्यांची रचना नीट समजून घेतली, त्यांच्या रचनेनुसार त्यांना हाताळले तर ते भरपूर टिकतात. हे भाग विशिष्ट अशा उत्पादनासाठी विशिष्ट प्रकारे बनवलेले असल्याने ते दुरुस्त करणे अवघड असते. रिप्लेस करणेसुद्धा जिकिरीचे, खर्चाचे असते. त्यांचे फोल्ड होणारे जॉइंट्स तसे तकलादू असतात. तिथे त्यांना नीट आधार देऊन अथवा काळजीपूर्वक ओढावे लागते. एवढय़ा तेवढय़ा कारणाने बॅगा खराब झाल्या तर हळूहळू वापरातून बाजूला जातात. वापरातून बाजूला पडलेल्या बॅगा ‘करून आणू एकदा,’ असं करत करत अडगळीत जातात. कारण, ‘करून आणू एकदा’ हा मुहूर्त उजाडतच नाही चटकन. तोवर नवीन खरेदी होऊन जाते. कारण मन आपल्याला सांगत असतं, आपल्याकडे काही एक गोष्ट धड नसते! नवीन गोष्ट आली की आधीची माळ्यावर आणखीन मागे लोटली जाते.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त

म्हणूनच बॅग निवडतानाच आपली गरज, प्रवासाचा प्रकार, कालावधी आणि प्रवास करायला आपण वापरणार असलेले वाहन, जिथे जाऊ तिथली हवामानाची गरज अशा सर्व गोष्टींचे भान ठेवावे लागते. तुम्ही बससारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जात असाल, तर मोठाल्या बॅगा नेऊन बसमध्ये शिरताच येणार नाही. लेग स्पेस कमी असलेल्या, डोक्यावर सामान ठेवायच्या जागा छोटय़ा असणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत ती बॅग जपून नेणे, यातच डोकं अर्ध होईल. इतरांना देखील तुमच्यासोबत गैरसोय होईल, ते वेगळेच. आपल्या आजूबाजूला कटकट करणारे, जास्त जागा सामानाने भरून ठेवणारे लोक आले तर वैताग येतो. तसेच आपल्यामुळे इतरांचे होऊ शकते. अशा वेळी आपली बॅग आणि सामानाचे किती डाग आपण एकटे उचलून नेणार आहोत, याचे भान असावे! घरातून अगदी गाडीने कुठे गेलात आणि तिथून सामान उचलून कुठे जायचे असेल तर सगळे जसेच्या तसेच पार पडेल, असे होत नसते. अचानक काही समस्या उद्भवली तर आपली गैरसोय होणार नाही आणि सुटसुटीत सामानात आपण पुढेही प्रवासाला लागू, इतका विचार करून ठेवायचा. त्यानुसार सामान जवळ बाळगायचे.

बॅगांना कुलूप आवश्यक असते. त्यातही अनेक प्रकार असतात. नंबर लॉक्स असतात. छोटी कुलुपं असतात. अटॅच लॉक्स असतात. त्या चाव्यांचे सेट्स सांभाळून ठेवावे लागतात. ते हरवले तर नवीन चाव्या बनवणे खर्चाचे काम असते. केवळ चावी सापडत नाही म्हणून ती बॅग घरात न वापरता पडून राहते. अटॅच लॉक्सच्या चाव्या दोन सेटमध्ये करून एक सेट घरात ठेवायचा आणि एक सेट कायम बॅगेत पडू द्यायचा. चेनमध्ये अडकवून कुलूप लावत असाल तर मुळात चेनच्या कोणत्या भागात तुम्ही ते कुलूप लावणार आहात, ते बघा. रनरला वेगळी कुलुपाची सोय असते. पण ते रनर तितके भक्कम आहेत का, ते बघा. साध्या रनरला ती सोय नसते. रनर ओढायच्या भागाला तुम्ही जर दोन रनर एकात एक जुळवून कुलूप लावणार असाल तर ते तुटून जाऊ शकतात. म्हणजे कुलूपही गेले आणि रनरदेखील तुटले, अशी वेळ ऐन प्रवासात ओढवते. बॅगांमध्ये कोंबलेले सगळे सामान रनरच्या, चेनच्या जीवावर त्यात आत तग धरून असते. बॅगेच्या तळाच्या जीवावर आणि एकूणच शिलाईवर, बनावटीवर त्यात सामान बसत असते. त्याच्या क्षमतेपेक्षा फार सामान त्यात टाकले तर सामान मावेल सुद्धा. पण ते प्रवासात इकडून तिकडे नेताना आदळले, आपटले तर सगळे सामान भसकन बाहेर येणार. म्हणूनच चेनच्या जीवाशी खेळणारी कुलुपं, रनरला जड होतील अशी कुलुपं लावायची नाहीत. नंबर लॉक्स आणि कुलुपं लावून झाली की बॅग ज्या बाजूने पडू शकते, ज्या बाजूने तिच्यावर इतर सामान येऊन आदळू शकते, त्याचा अंदाज घेऊन रनरची कुलुपे एका सुरक्षित भागाला आणून सेट करायची. अगदी समोरच वरच्या बाजूने कुलूप लावले तर कुलूपच रनर तोडून टाकू शकते. कुलूप शक्यतो एका बाजूने आणि रनरच्या आरामदायी सेटिंगला लावावे, जेणेकरून ते सहज तुटणार नाही.

असे अनेक एकेक बारकावे आपले आपल्याला कळत जातात वापरातून. म्हणूनच बॅगेचे डिझाइन नीट पाहून त्यातल्या सोयी समजून घ्यायच्या. बॅगेची रचना समजून घ्यायची आणि त्यानुसारच त्यात सामान भरायचे.

बॅगांना कुलूप आवश्यक असते. त्यातही अनेक प्रकार असतात. नंबर लॉक्स असतात. छोटी कुलुपं असतात. अटॅच लॉक्स असतात. त्या चाव्यांचे सेट्स सांभाळून ठेवावे लागतात. ते हरवले तर नवीन चाव्या बनवणे खर्चाचे काम असते. केवळ चावी सापडत नाही म्हणून ती बॅग घरात न वापरता पडून राहते. अटॅच लॉक्सच्या चाव्या दोन सेटमध्ये करून एक सेट घरात ठेवायचा आणि एक सेट कायम बॅगेत पडू द्यायचा.

prachi333@hotmail.com