लिव्हिंग रूम इंटिरियरमधील अपरिहार्य घटक म्हणजे सीटिंग अर्थात बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था या विषयाचे आपण दोन भागांत विभाजन करू या. यातील पहिला भाग आहे बैठक व्यवस्थेचा आराखडा. म्हणजेच बैठक व्यवस्था कोणत्या प्रकारचे घ्यावे तसेच ते कुठे ठेवावे, इ. व दुसरा भाग आहे बैठक व्यवस्थाचे विविध प्रकार. आजच्या लेखात आपण पहिल्या भागासंबंधी माहिती घेऊ.

किती आसने असावीत, कुठल्या भिंतीला टेकून ठेवावे, कशा प्रकारचे असावे, या सगळ्या घटकांचा विचार करावा लागतो. हा विचार करताना आपल्याला लिव्हिंग रूमचा आर्किटेक्टरल ले-आऊट, कुटुंबाची गरज व इंटिरियरचे बजेट.. या बाबींचा अभ्यास करावा लागतो. हल्लीच्या बहुतांश घरांचा आर्किटेक्चरल ले-आऊट हा एकाच धाटणीचा असतो. बहुतेक लिव्हिंग रूम एल शेप लिव्हिंग कम डायनिंग रूम असतात. त्यामुळे बैठकीच्या व्यवस्थेत विशेष फरक होत नाही. आताच्या लिव्हिंग रूम ले-आऊटमध्ये टीव्ही व बैठक व्यवस्थेतील अंतर कमी असते. आधीच्या काळात आपल्याला टीव्ही लांबून पाहायची सवय होती. हे अंतर जास्त होतेच व टीव्हीचा आकारही लहान होता. आता हे अंतर निम्मं झालं आहे व टीव्हीचा आकार तिपटीने, चौपटीने वाढला आहे. पण अद्ययावत तंत्रज्ञानामुळे जवळून टीव्ही बघितल्यानेही डोळ्याला त्रास होत नाही, हेही तितकेच खरे आहे.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?

बऱ्याचशा लिव्हिंग रूममध्ये बैठक व्यवस्थेची भिंत, त्यासमोर टीव्ही युनिटची भिंत व या दोन्ही भिंतींना जोडणारी भिंत- ज्या भिंतीला मोठ्ठाली खिडकी अथवा फ्रेंच विंडो असलेली बाल्कनी असा प्रकार असतो. बैठक व्यवस्था ज्या भिंतीला टेकवून ठेवली जाते ती भिंत व खिडकीचा काही भाग व्यापणारी एल (छ) शेप बैठक व्यवस्था ठेवली जाते. खिडकीचा जवळपास चार ते पाच फूट भाग व्यापला जात असल्याने खिडकी व पडदा अर्धवट दिसतो व शोभा थोडी कमी होते, तसेच नैसर्गिक सूर्यप्रकाशही अडला जातो व खिडकी/ बाल्कनी/ पडदा हे नीटपणे हाताळता येत नाहीत. अशा प्रकारे एल शेप बैठक व्यवस्था ठेवायची असेल तर खिडकीच्या बाजूस असलेल्या सोफ्याला बॅकरेस्ट घेऊ नये जेणेकरून बैठक व्यवस्था बोजड दिसणार नाही, नैसर्गिक प्रकाश कमी प्रमाणात अडेल. तसेच खिडकी/ बाल्कनी/ पडदा यांची शोभा बऱ्याच अंशी टिकून राहील.

हा एल शेप सोफा उलटय़ा प्रकारेही ठेवता येतो. खिडकीच्या बाजूस सोफ्याचा दुसरा भाग न ठेवता खिडकीच्या समोरील बाजूस कुठल्याही भिंतीला न टेकता ठेवता येतो. म्हणजेच सोफा टेकवून ठेवण्याची भिंत आधीच्याच प्रकारे वापरून केवळ सोफ्याच्या दुसऱ्या भागाचे स्थान बदलते. या प्रकाराचा फायदा असा की, खिडकी पूर्णत: मोकळी राहते. त्यामुळे त्यातून दिसणारे दृश्य अबाधित राहते. पडद्याची शोभा पूर्णपणे दिसते. बाल्कनी/ खिडकी/ पडदा सुलभतेने हाताळता येतो व महत्त्वाचे म्हणजे सूर्यप्रकाशात अडथळा येत नाही. पण या प्रकाराचा तोटा असा आहे की, सोफ्याचा एक भाग रूमच्या मध्यावर ठेवला जातो. लिव्हिंग रूम बऱ्यापैकी मोठी असल्याशिवाय या प्रकारे सोफा ठेवता येत नाही. लिव्हिंग रूम लहान असल्यास अशा प्रकारे सोफा ठेवू नये. कारण मध्ये ठेवलेल्या सोफ्यामुळे रूमचे दोन भागांत विभाजन झाल्यासारखे वाटते व आधीच आकाराने लहान लिव्हिंग रूम आणखीन लहान भासते.

या प्रकारातही रूमच्या मधे येणाऱ्या सोफ्याच्या भागास बॅकरेस्ट घेऊ नये, जेणेकरून बोजडपणा कमी होईल. एल शेपची बैठक व्यवस्था कॉर्नर टेबल न घेता सलग घेतली तर एल शेप बैठक व्यवस्थाचा कमी लांबीचा भाग हा रिक्लायवरसारखा असतो, ज्यावर एखादा माणूस झोपू शकतो अथवा पाय पसरून आरामात बसू शकतो. हाच भाग खिडकीच्या बाजूला अथवा रूमच्या मध्यावर ठेवला जातो. एल शेप बैठक व्यवस्थेवर साधारणपणे पाच माणसांची बसायची सोय होऊ शकते. एल शेप बैठक व्यवस्था वापरण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे.

दुसरा प्रकार आहे सी (उ) शेप बैठक व्यवस्था. या प्रकारात इंग्रजी सी अथवा यू अक्षराच्या आकारात बैठक व्यवस्था केली जाते. लिव्हिंग रूम खूप मोठी असल्याशिवाय या प्रकारची बैठक व्यवस्था ठेवणे अशक्य आहे. केवळ मोठय़ा फ्लॅट्समध्ये व बंगल्यांमध्ये अशा प्रकारची बैठक व्यवस्था वापरली जाते.

तिसरा प्रकार आहे पॅरेलल बैठक व्यवस्था. या प्रकारात समोरासमोरील भिंतींना टेकून सोफा ठेवला जातो व मधे कॉर्नर टेबल ठेवले जाते. याचा फायदा असा, की समोरासमोर आरामात गप्पा मारता येतात, पण तोटा असा, की दोन्ही सोफ्यांवरील माणसांना मान वाकडी करून टीव्ही पाहावा लागतो. जास्त वेळ टीव्ही पाहताना थोडा त्रास होतो. या प्रकारात खिडकी बऱ्यापैकी मोकळी राहते.

चौथा प्रकार आहे सिंगल बैठक व्यवस्था. लिव्हिंग रूमचा आकार खूपच लहान असल्यास एल शेप, सी शेप किंवा पॅरेलल बैठक व्यवस्था ठेवणे शक्य नसते. अशा वेळेस सिंगल सोफ्याला पर्याय नसतो. हा सोफा जास्तीत जास्त चार आसनांचा घ्यावा. यापेक्षा जास्त नको व सोफ्याच्या बाजूला साइड टेबल जरूर घ्यावे. त्यामुळे सोफा सेट पूर्ण वाटतो. आवश्यकता वाटल्यास दोन छोटय़ा सिंगल पूफीज्ही अतिरिक्त बैठक व्यवस्थासाठी वापरू शकता.

आपल्या लिव्हिंग रूमच्या ले-आऊटप्रमाणे सोफा कोणत्या प्रकारे ठेवावा हे ठरवावे. किती माणसांची बसण्याची सोय करायची आहे, त्यावर किती आसनांचा सोफा घ्यायचा ते ठरवावे व आपल्या बजेटनुसार सोफा निवडावा. गरज असल्यास सोफ्याच्या खालच्या भागात आपण स्टोरेज बनवू शकता अथवा सोफा-कम-बेडचाही वापर करू शकता. लिव्हिंग रूममधील बैठक व्यवस्था हा सगळ्यात महत्त्वाचा व अपरिहार्य घटक असल्याने काळजीपूर्वक डिझाइन करावे.

या भागात आपण बैठक व्यवस्था कशी असावी  याची माहिती घेतली. पुढील भागात आपण बैठक व्यवस्थेच्या विविध प्रकारांची माहिती घेऊ या.

(इंटिरियर डिझायनर)

ajitsawantdesigns@gmail.com