घरात एसी असेल तर तुमच्या वीजबिलाचा आकडा नेहमी जास्तच असतो. मात्र, एसीचा वापर करुनही वीजबिल आटोक्यात ठेवण्यासाठी व ऊर्जाबचत करण्यासाठी खालील उपाययोजना फायदेशीर ठरू शकते-
* तुमच्या एसीचं थर्मोस्टॅट्स सेटिंग २४ अंश सेल्सियस ते २६ अंश सेल्सियस या रेंजमध्ये ठेवा. योग्य त्या थंडाव्यासाठी ही प्रमाणित रेंज आहे. थर्मोस्टॅट सेटिंगमधील १ अंश सेल्सियसमधील बदलही तुमच्या विजेच्या बिलामध्ये ३ टक्के ते ५ टक्के कपात वा वाढ करू शकतो.
* दर महिन्याला एसीचा फिल्टर तपासा आणि स्वच्छ करा. यामुळे थंडावा वाढेल आणि ऊर्जेचा वापर कमी होईल.
* एसी चालू असताना तुमच्या खोलीमधून थंड हवा बाहेर जाणार नाही याची खात्री करा. त्यामुळे रूम एअर कंडिशनर्सचा ऊर्जा वापर कमी होण्यास मदत होते.
* एसीचा वापर करताना तुमच्या खोलीमध्ये सूर्यकिरणे येणार नाहीत याची काळजी घ्या. असे केले नाही तर तुमच्या खोलीमध्ये उष्णता वाढेल आणि खोली थंड होण्यामध्ये वेळ लागेल. एसी वापरताना तुम्हाला नसíगक सूर्यप्रकाश हवा असेल तर तुम्ही खिडक्यांवर रिफ्लेक्टिव्ह फिल्मचा वापर करू शकता. अशा फिल्म्स प्रकाशाला अडथळा न आणता ४०-६० टक्के उष्णता कमी करू शकतात, ज्यामुळे तुमची रूम छान आणि प्रकाशित राहील.
* एसी तज्ज्ञाद्वारे प्रत्येक मोसमाच्या सुरुवातीला कंडेन्सर/ इव्हॅपोरेटर कॉइल्स स्वच्छ करण्याद्वारे तुमच्या एसीची पूर्ण सíव्हस करण्याची शिफारस केली जाते. तथापि, अशा सíव्हसेसची वारंवारता एसी लावलेल्या ठिकाणावर अवलंबून असते. धूळ, प्रदूषण आणि खारे पाणी असलेल्या ठिकाणी एसीची जास्तवेळा सíव्हसिंग करण्याची गरज असते.
* एसी सुरू असताना पंखेही चालू असतील तर एसीची हवा घरभर खेळती राहण्यास मदत होते.

रूम एअर कंडिशनर्सवरील स्टार्स वीज वाचविण्यात कसे सहाय्यभूत ठरतात?
रूम एअर कंडिशनर्स खरेदी करताना ग्राह्य धरण्यात येणारा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. बहुतांश ग्राहक एसी खरेदी करताना किमतीला भुलतात. मात्र प्रत्यक्ष एसी घरात बसविल्यावर येणाऱ्या वीजबिलाचा विचार करीत नाहीत. एसीवरील स्टार्स हे कमीतकमी २ वर्षांमध्ये तुमची खरेदी किंमत शक्य तितकी कमी करण्यास मदत करतात.
एसीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी युनिटशी संबंधित मुद्दे समजून घ्या.
* कूल मोड- कूल मोड नॉर्मल मोड आहे; जेव्हा एअर कंडिशनर सेट केलेले तापमान आणि सेट केलेल्या फॅन स्पीडवर चालतो. यामध्ये ऊर्जा बचत शक्य आहे आणि ती सेट केलेल्या तापमानावर अवलंबून आहे.
* फॅन मोड- फॅन मोडमध्ये फॅन सतत चालू राहतो आणि कॉम्प्रेसर बंद राहतो. निश्चितच यामुळे ऊर्जा बचत होते. कारण कॉम्प्रेसर बंद राहतो, जो सर्वाधिक ऊर्जा वापरतो.
* ड्राय मोड- पावसाळ्यासारख्या जास्त आद्र्रतेच्या दिवसांत हा मोड योग्य आहे. समुद्राजवळ राहणाऱ्या लोकांकरिता हा मोड जास्त महत्त्वाचा आहे. पावसाळ्यामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते, आद्र्रता कमी झाल्यामुळे रूममध्ये या मोडवर एसी ठेवलयाने घरात चांगली हवा खेळती राहते. म्हणूनच ड्राय मोडमध्ये एअर कंडिशनर चालू केल्यामुळे हवेतील जास्तीची आद्र्रता कमी होण्यामध्ये मदत होते. कारण कूल मोडच्या तुलनेत फॅन कमी वेगाने चालतो आणि कॉम्प्रेसर खूपच कमी काळासाठी चालू राहतो. यामुळे ऊर्जेचा वापर कमी होण्यामध्ये मदत होते. इथे हवा शुष्क करण्याचा उद्देश असतो, रूम थंड करण्याचा नाही.
*  स्लीप मोड- स्लीप मोड तापमान २ अंशापर्यंत वाढेपर्यंत प्रत्येक एका तासानंतर १ अंशद्वारे सेट केलेले तापमान वाढवतो. त्यानंतर एअर कंडिशनर आणखी ६ तास चालतो. यामुळे वीज बचत होते.
अनेकदा एसी घेताना आपल्यासमोर वीजच्या वाढत्या बिलाचे चित्र समोर उभे राहते. परंतु एसी काळजीपूर्वक वापरल्यास तुम्हाला आरामदायी थंड हवाही मिळेल आणि वीजबिलही वाढणार नाही.