इमारत बांधणीत वास्तुविशारदाची भूमिका स्पष्ट करणारा लेख
वास्तुविशारद हा इमारत आराखडय़ातील आपले ज्ञान आणि लोकांची गरज लक्षात घेऊन इमारतीचा आराखडा आखत असतो. आणि कागदावरील तो आराखडा इमारतीला अभियंते, कंत्राटदार यांच्या मदतीने सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करतो.
एखादी दर्जेदार इमारत बांधण्यासाठी वास्तुविशारदाला काही महत्त्वाचे आणि प्राथमिक टप्पे गाठावे लागतात. पहिला म्हणजे ग्राहकाशी सल्लामसलत. जेव्हा एखादा ग्राहक अथवा बिल्डरला एखाद्या इमारतीची रचना करायची असेल वा बांधून घ्यायची असेल तेव्हा अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आपल्या ग्राहकाला भेटून त्याच्याशी सल्लामसलत करणे हे अत्यंत गरजेचे ठरते. या चच्रेतून वास्तुविशारदाला ग्राहकाची  अपेक्षा, अर्थात स्ट्रक्चर कशा पद्धतीचे हवे आहे, निवासी घरांची संख्या, इमारतीचा मुख्य वापर या मुद्दय़ांवर स्पष्टता येते. ग्राहकाची गरज आणि उद्देशानुसार वास्तुविशारदाने ग्राहकाच्या बजेटविषयीही चर्चा करणे अपेक्षित आहे. ग्राहक वा बिल्डरच्या बजेटवर वास्तुविशारदाचे काम अवलंबून असते. ग्राहकांच्या कल्पना विचारात घेता वास्तुविशारद आपले कौशल्य पणाला लावून काही पर्याय सुचवत बजेटमध्ये काम पूर्ण करू शकतो. अचूक डिझाइन हे वास्तुविशारदाचे महत्त्वाचे काम असते. कामातील अडथळ्यांचा विचार करून संरेखन, ग्रिड्सचे नियोजन, विरुद्ध वायुविजनाची योजना, बांधकामातील जागेला भेट देणे, त्याचे सव्‍‌र्हेक्षण करणे, जमीन, हवामान, टोपोग्राफिक रचना यांचा अधिकाधिक वापर करता येतो.
वास्तुविशारदांना केवळ डिझायनर म्हणून न गणता त्याची मुख्य भूमिका पार पाडू देण्याचे आश्वासन द्यावे. यामुळे त्याला बांधकामाच्या जागेशी संबंधित समस्या, जमिनीचा पोत, भार उचलण्याची क्षमता आणि भूकंपविषयक उपाय करण्यासाठी त्याला मोकळीक मिळते. अभियंते वातावरण आणि हवामानविषयक सर्व बाबींची पुन: पडताळणी करू शकतात.
एक्सटीरियर आणि इंटीरियरसाठी वापरण्यात येणारे साहित्य वास्तुविशारदाने सुचविल्याप्रमाणेच असावे. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा एखाद्या वास्तुविशारदाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव असतो, ज्याआधारे तो एखादा रंगच का वापरावा किंवा नदीची वाळू वापरावी की समुद्राची वाळू, सौर ऊर्जेच्या साधनांचा वापर कसा करावा हे समजून घेतो. इमारतीच्या एक्सटीरियर, एसीसाठी जागा ठेवणे, संपर्कसाधनांसाठी जागा, लँडस्केिपग याचाही वास्तुविशारद विचार करतो. वास्तुविशारद इमारतीच्या इंटीरियरसाठी साहित्यही सुचवू शकतो. जेव्हा एखादा वास्तुविशारद एखादे संकल्पचित्र रेखाटतो तेव्हा त्याने इमारतीचे नियम आणि निकष, अग्निशामक निकष यांचाही विचार करणे अपेक्षित असते.
बांधकामात दर्जा मिळवण्यासाठी सध्याच्या काळात वास्तुविशारद, सुपरवायझर, अभियंते, सेवा अभियंते, लँडस्केपर्स यांच्याबरोबरीने समर्पण वृत्तीने काम करणारे कंत्राटदार, कामगार आणि नव्या तंत्रज्ञानाचे साहाय्य घेता येते. दर्जेदार काम होण्यासाठी या सर्व घटकांना एकत्र आणणे गरजेचे आहे. नक्कीच हे खडतर काम असले तरी आपल्याकडे काय आहे आणि काय नाही, हे समजून घेतले तर प्रत्येक कामाच्या वेळी पुढे जाण्यास याची नक्कीच मदत होईल.

Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
bullcart race sculpture created in bhosari
भोसरीत बैलगाडा शर्यतीच्या शिल्पाची उभारणी
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन