विश्वासराव सकपाळ

व्यवस्थापन समितीतील नमित्तिक पद भरण्याच्या सुधारित कार्यपद्धतीविषयी माहिती देणारा लेख..

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती

प्रथम आपण व्यवस्थापन समितीचे अधिकार, उद्देश व कार्यपद्धती याबाबत थोडक्यात जाणून घेऊ. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ अन्वये संस्थेचे व्यवस्थापन हे, हा अधिनियम किंवा त्याखाली तयार केलेले नियम आणि संस्थेचे उपविधी यानुसार स्थापन केलेल्या व्यवस्थापन समितीमध्ये विहित होते. सामान्यपणे समितीचे सर्व सदस्य या प्रयोजनार्थ घेतलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येतात तेव्हा व्यवस्थापन समिती गठीत झाल्याचे समजण्यात येते. व्यवस्थापन समितीने अधिनियम, नियम व उपविधीअन्वये अनुक्रमे देण्यात येतील किंवा लादण्यात येतील अशा अधिकारांचा वापर केला पाहिजे आणि अशी कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. व्यवस्थापन समितीने तिच्या कालावधीत संस्थेच्या कामकाजाशी संबंधित असे जे निर्णय घेतले असतील, अशा सर्व निर्णयांसाठी समितीचे सदस्य संयुक्तपणे व पृथकपणे जबाबदार असतील. संस्थेच्या हितास हानी पोहोचविणाऱ्या सर्व कृती व अकृतींना समितीचे सदस्य संयुक्तपणे व पृथकपणे जबाबदार असतील.

राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या सर्व निवडणुका घेण्यासाठी तसेच निर्देशन व नियंत्रण हे राज्य शासनाने त्याबाबतीत गठीत केलेल्या ‘राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्राधिकरणाकडे सोपविण्यात आले आहे. व्यवस्थापन समिती सदस्यांची प्रत्येक सार्वत्रिक निवडणूक आणि लागू असलेल्या मर्यादेपर्यंतचे कोणतेही नमित्तिक रिक्त पद यासह संस्थेच्या व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांची निवडणूक विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार घेण्यात येते. त्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम-२०१४ ची तरतूद करण्यात आली. सदरहू तरतुदीनुसार राज्यातील गृहनिर्माण संस्थांसह सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना अत्यंत त्रासदायक, खर्चीक व वेळखाऊ पद्धतीने व्यवस्थापन समितीतील नमित्तिक रिक्त पद भरण्याच्या प्रक्रियेस सामोरे जावे लागत असे. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीतील एखादा समिती सदस्य निधन पावल्यास, किंवा राजीनामा दिल्यास अथवा त्याला अपात्र ठरविण्यात आल्यास अथवा त्याला संस्थेतून काढून टाकण्यात आल्यास अशा रीतीने रिक्त झालेल्या जागा या नमित्तिक रिक्त जागा या सदरात येत असल्यामुळे, सदरच्या नमित्तिक रिक्त जागा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विहित केल्याप्रमाणे भरणे बंधनकारक होते. त्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीतील नमित्तिक रिक्त पद भरण्यासाठी निवडणूक अधिकारी किंवा यथास्थिती याबाबतीत उपनिबंधक यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी ती रिक्त जागा भरण्याकरिता निवडणुका घेण्याची व्यवस्था करील.

(अ ) व्यवस्थापन समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या कोणत्याही नमित्तिक रिक्त पदाबाबत असे रिक्त पद निर्माण झाल्यापासून १५ दिवसांच्या आत कळवेल.

(ब ) संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सचिव विभागीय उपनिबंधक यांजकडे व्यवस्थापन समितीतील नमित्तिक रिक्त पद भरण्यासाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्यासाठी लेखी अर्ज करील.

(क ) त्यावर संबंधित उपनिबंधक सदरहू अर्जाची विषयपरत्वे तपासणी करून खात्री झाल्यावर, प्राधिकृत अधिकारी नेमल्याबाबतचा आदेश पारित करतील.

(ड) व्यवस्थापन समितीतील नमित्तिक पद भरण्यासाठी व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यासाठी प्राधिकृत अधिकारी कळवेल.

(निवडणुकीच्या संबंधात अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यास प्रवासभत्ता, दैनिक भत्ते व पारिश्रमिक निवडणूक निधीतून (रुपये २५००/- चा धनादेश व इतर चहापानाचा खर्च.)

(ई ) एखाद्या व्यवस्थापन समितीवर एकापेक्षा अधिक जागांवर कोणतीही व्यक्ती निवडून आली असेल, तर त्याबाबतीत निवडणुकीचे निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत तिने निवडणूक अधिकारी किंवा यथास्थिती त्याबाबतीत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्राधिकृत केलेला अधिकारी यास स्वत:च्या सहीनिशी लेखी कळवून एक जागा सोडून इतर सर्व जागांचा तिने राजीनामा दिला नसेल तर या सर्व जागा रिक्त होतील. असा राजीनामा मिळाल्यानंतर किंवा उपरोक्तप्रमाणे सर्व जागा रिक्त झाल्यानंतर, निवडणूक अधिकारी किंवा यथास्थिती याबाबतीत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्राधिकृत केलेला अधिकारी ती रिक्त जागा भरण्याकरिता निवडणुका घेण्याची व्यवस्था करील.

(ख) व्यवस्थापन समितीने तिची निवडणूक घेण्यासंबंधात, पोट कलम (१) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळविण्यास बुद्धीपुरस्सर कसूर केली असेल तर.. आणि त्यामुळे कोणत्याही कारणास्तव, मुदत संपण्यापूर्वी व्यवस्थापन समितीची निवडणूक घेता आली नसेल तर समितीचे सदस्य त्यांचे अधिकारपद धारण करण्याचे बंद करतील. अशा परिस्थितीत निबंधक कलम ७७-अ अन्वये योजिल्याप्रमाणे कारवाई करतील.

(ग ) पोट-कलम (२) अन्वये अशी कारवाई केल्यावर अशा प्रकारे नियुक्त केलेला प्राधिकृत अधिकारी तात्काळ निवडणूक घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवेल. आणि विनिर्दष्टि कालावधीत अशी निवडणूक घेण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याकरिता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला साहाय्य करेल.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम / नियमाद्वारे राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसह सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार ‘राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास’ आहे. मात्र, सहकारी गृहनिर्माण संस्था या इतर संस्थांप्रमाणे नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन झाल्या नसल्याने, त्यातही काही संस्थांची सभासद संख्या तुलनेत कमी असल्याने, मोठय़ा संस्थांचे नियम त्यांना लागू करताना दैनंदिन कामकाजात अडचणी येत होत्या. त्यामुळे कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत निवडणूक घेण्याच्या नियमातून वगळण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्या अनुषंगाने राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसह सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना व्यवस्थापन समितीतील नमित्तिक रिक्त पद भरताना होणाऱ्या त्रासातून व जाचातून दिलासा देणारा सुधारित आदेश नुकताच मा. आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांनी पारित केला आहे तो खालीलप्रमाणे  :-

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ सीबी व महाराष्ट्र सहकारी संस्था  (समितीची निवडणूक) नियम २०१४ चे नियम ३ (५) अन्वये प्राप्त अधिकारानुसार प्राधिकरण ज्या सहकारी संस्थेच्या समितीची मुदत संस्थेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिनांकापासून अडीच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झालेली आहे, अशा समितीत निर्माण झालेल्या नमित्तिक रिक्त जागा- ज्या प्रवर्गातील आहेत त्याच प्रवर्गातील पात्र सदस्यांमधून स्वीकृतीने संस्थेच्या समितीकडून संचालक मंडळ सभेमध्ये निर्णय घेऊन भरण्यास आदेश देत आहे. नमित्तिक रिक्त जागा भरण्याबाबत प्राधिकरण पुढीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करीत आहे.

१)     नमित्तिक रिक्त पदाबाबतची माहिती संबंधित संस्था प्राधिकरणास व जिल्हा / तालुका /वॉर्ड सहकारी निवडणूक अधिकारी यांना पद रिक्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत कळवेल.

२)     ज्या प्रवर्गातील जागा रिक्त झाली आहे, त्याच प्रवर्गातील तसेच पोटनियमात नमूद संबंधित मतदारसंघ / गटातील संस्थेच्या सभासदांमधील पात्र व्यक्तींची अधिनियम, नियम, संबंधित संस्थेचे पोटनियम व निवडणूक नियमानुसार संचालक मंडळ असे नमित्तिक रिक्त झालेल्या पदासाठी स्वीकृतीने निवड करेल.

३)     अशी नमित्तिक रिक्त पदे भरण्याकरिता संस्था पोटनियमातील संबंधित तरतुदीनुसार संचालक मंडळाच्या सभेचे आयोजन करेल.

४)     संबंधित संस्थेचे सचिव / मुख्य कार्यकारी अधिकारी तत्पूर्वी नमित्तिक रिक्त जागा भरण्याकरिता इच्छुक, पात्र सभासदांकडून अर्ज मागवण्याच्या प्रयोजनार्थ संस्थेच्या नोटीस बोर्डावर व निबंधक कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर नोटीस देऊन सदर नोटिशीत अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक नमूद करेल. अर्ज सादर करण्यासाठी किमान ७ ते १५ दिवसांचा अवधी देणे आवश्यक राहील.

तसेच अशी नोटीस लावल्याबाबतचा पंचनामा करेल.

५)     इच्छुक सभासद आपल्या अर्जासह रिक्त पदासाठी पात्र असल्याबाबत स्वयंघोषणापत्र व यानुसार सदर सभासद महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ७३ कअ व नियम १९६१ व संस्थेचे मंजूर उपविधीनुसार संचालक होण्यास अपात्र नाही असे घोषणापत्र विहित मुदतीत संस्थेचे सचिव / मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अर्जासोबत सादर करेल.

६)     सदर अर्जाची तसेच संबंधित माहितीची छाननी करून संचालक मंडळ सभेचे आयोजन वरील अ. क्र. ४ मध्ये नमूद केलेल्या अंतिम दिनांकापासून १५ दिवसांच्या आत करण्याबाबत संस्थेचा सचिव / मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यवाही करेल.

७)     सदर संचालक मंडळ सभा रिक्त पदे भरण्याबाबतच्या एकाच विषयावर घेण्यात येईल. सदर सभेत अन्य विषयावर चर्चा करता येणार नाही. तसेच मागील सभांमधील इतिवृत्त कायम करण्याबाबत देखील कार्यवाही करता येणार नाही.

८)     संस्थेचा सचिव / मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक मंडळ सभेमध्ये झालेला निर्णय व इतिवृत्त सभा झाल्यापासून ७ दिवसांच्या आत संबंधित निबंधकाकडे व जिल्हा / तालुका / प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करेल. सदर सभेमध्ये झालेल्या निर्णयाचा / इतिवृत्ताचा नमुना खाली दिला आहे त्याप्रमाणे शब्द रचना करण्यात यावी.

९)     अशा प्रकारे स्वीकृतीने / नामनिर्देशनाने भरावयाची नमित्तिक रिक्त पदे ही समितीच्या एकूण कालावधीत दोनपेक्षा अधिक भरता येणार नाहीत. प्रथम रिक्त होणाऱ्या दोन जागा / पदे स्वीकृतीने भरण्यात यावीत व तद्नंतर रिक्त होणाऱ्या जागा / पदे निवडणुकीद्वारे भरण्याचा प्रस्ताव प्राधिकरणास सादर करा येईल.

१०) निवडणूक निकालाच्या दिनांकापासून अडीच वर्षांच्या आत संचालक मंडळात नमित्तिकपणे रिक्त झालेली जागा निवडणुकीद्वारे भरता येईल.

नमित्तिक रिक्त जागा भरण्याची उपरोक्त कार्यपद्धती संबंधित जिल्हा / तालुका / प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त सहकारी संस्थांच्या निदर्शनास आणून विहित कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घ्यावी.

vish26rao@yahoo.co.in