स्मार्टफोनचा वापर वाढत असताना शक्य तितकी काय्रे अ‍ॅप्समध्ये रूपांतरित करून तुमच्या स्मार्टफोनवर हजर केली जात आहेत. याला तुमचे घरदेखील अपवाद नाही. घरातील दिवे बंद करणे, दार उघडणे, टीव्ही चालू करणे यांसारखी कामेदेखील स्मार्टफोनच्या मदतीने करणे शक्य झाले आहे.
अनेकदा आपल्याला ऑफिस आणि घर यांच्यामध्ये समन्वय साधणे कठीण जाते. किंवा घरगुती कामांना हातभार लावण्यास पुरेशी माणसे हाताशी नसतात. आता तुमचा स्मार्टफोन तुमच्या या समस्यांचे निवारण करू शकतो. तो तुम्हाला कोणत्याही जागेवरून, कोणत्याही वेळी अनेक कामे पार पाडण्यात मदत करू शकतो. तुमच्या फोनमधून घराशी संपर्क करता येण्याबरोबरच तुम्ही बाहेर असताना घरातील घडामोडींबाबत तो तुम्हाला सतर्क करू शकतो.
हे कसे काम करते?
कुठूनही आणि कोणत्याही वेळी नियंत्रण प्रस्थापित करता येईल अशा रीतीने घरातील साधने आणि उपकरणे जोडणे ही होम ऑटोमेशनमागील संकल्पना आहे. उदाहरणार्थ- तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही मौल्यवान वस्तू आहेत. तुमच्या घरात खूप मंडळी आली आहेत आणि म्हणून  तुम्हाला त्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते आहे. अशावेळी होम ऑटोमेशन तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमच्या वॉर्डरोबच्या जवळ कोणीही आले तरी तुम्हाला सतर्क करते. होम ऑटोमेशन घरातील साधने आणि उपकरणे यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याकरिता कॉम्प्युटर आणि माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करते. घरातील मंडळींना सिस्टीम्स आणि उपकरणे यांचा ताळमेळ साधण्याकरिता तसेच स्मार्टफोन किंवा टॅब्लेट कॉम्प्युटर व संबंधित व्यक्ती यांच्यात मध्यस्थाचे काम करणाऱ्या उपकरणाची गरज असते. इमारतींकरिता ऑटोमेशन नेटवर्क्‍सचा विकास केला जातो, जेणेकरून प्रत्येकाला व्यक्तिगतरीत्या त्याचा लाभ घेता यावा.
स्मार्टफोन तुमच्या घरावर नियंत्रण कसे ठेवू शकतो?
*     तुमच्या घरातील मनोरंजन प्रणालीचे व्यवस्थापन:
तुमच्या स्मार्टफोनच्या साहाय्याने तुमचा टी.व्ही, डीव्हीडी प्लेयर, स्पीकर्स अशा मनोरंजनविषयक उपकरणांवर नियंत्रण ठेवता येते. एका टच-पॉइंटच्या साहाय्याने तुम्ही वेगवेगळे म्युझिक झोन्स घरात असताना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये संगीताचे स्ट्रीिमग, अनेक खोल्यांमध्ये व्हिडीयोचे स्ट्रीिमग आणि या उपकरणांवर दूरस्थ पद्धतीने नियंत्रण प्रस्थापित करणे अशा गोष्टी करता येतात.
*     साधने आणि उपकरणांचे व्यवस्थापन
तुमच्या फोनच्या साहाय्याने टी.व्ही, मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रिक पडदे आणि दारे यांसारख्या साधनांचे व्यवस्थापन करता येते. तुम्ही घरी नसाल तेव्हाही दूरस्थ पद्धतीने या साधनांचे व्यवस्थापन करता येते. उदाहरणार्थ- एखाद्या दिवशी खूप उकाडा असेल तर तुम्ही घरी पोहोचण्याआधीच एसी चालू करून ठेवू शकता आणि तुम्ही पोहोचल्यावर मुख्य दार उघडून दिवे चालू करू शकता.
*     तुमच्या घरातील प्रवेश-प्रणालीवर नियंत्रण ठेवा
कॅमेरा, माइक आणि स्पीकर्स यांच्या एकात्मिक प्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या  घरी येणाऱ्या पाहुण्यांबद्दल सतर्क राहता येते. त्यांच्याशी संवाद साधता येऊ शकतो आणि तुमच्या जागेवरून जराही न हलता त्यांना घरात प्रवेश देता येऊ शकतो. तुम्ही घरात नसताना आलेल्या पाहुण्यांची नोंददेखील तुमच्याकरिता ठेवली जाते. तुम्ही तिथे नसतानाही त्यांच्याशी बोलू शकता.
*     सुरक्षा व्यवस्थापन आणि सतर्क करणे
होम ऑटोमेशनच्या उपयुक्त फायद्यांपकी एक फायदा म्हणजे ते पुरवीत असलेल्या सुरक्षेचा दर्जा हा होय. वेगवेगळ्या पॉइंट्सवर बसवलेल्या बहुविध सेन्सर्समधून तो तुम्हाला घरातील अवैध प्रवेशाबाबत सतर्क करतो. उदाहरणार्थ- तुम्ही घरी नसताना तुमचे कपाट किंवा तिजोरी यांच्या आसपासदेखील कोणी आले तरी होम ऑटोमेशन तुम्हाला तुमच्या फोनवर सतर्क करते. सव्‍‌र्हेलन्स कॅमेरा आणि सेन्सर्स यांचा मेळ घालून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर तुमच्या घरातील संशयास्पद हालचालींबद्दलची माहिती किंवा नोटिफिकेशन्स मिळवू शकता.
*     तुमच्या घराला झालेल्या कोणत्याही प्रकारच्या हानीबद्दल तुम्हाला कळवते
तुम्ही घराबाहेर आहात आणि  तुमच्या घरात गॅसगळती किंवा इलेक्ट्रिक स्पार्क होत असेल तर स्मार्टफोन तुम्हाला एसएमएस, ईमेल, नोटिफिकेशन किंवा आणीबाणीच्या काळात पूर्वीपासून यादीकृत असलेल्या नंबर्सना कॉल करून सतर्क करू शकेल. तुम्ही नििश्चत होऊन घराबाहेर पडू शकाल आणि तत्काळ सूचना मिळाल्याने संभाव्य हानीही रोखू शकाल. तुमचा स्मार्टफोन तुमची जीवनशैली बदलू शकेल. खासकरून तुम्ही तुमचा बहुतेक वेळ घरापासून दूर असाल आणि सतत फिरतीवर असाल तर हा बदल खूप लक्षणीयरीत्या ध्यानात येऊ शकेल. तुमच्या फोनच्या माध्यमातून केलेले होम ऑटोमेशन तुमचे जीवन समृद्ध करण्याशिवाय बऱ्याच गोष्टी करू शकतो. तुमच्या साधनावरून केल्या जाणाऱ्या केंद्रीय नियंत्रणाच्या साहाय्याने तुम्ही दार नीट बंद केले आहे की नाही, याबद्दल सदैव सचिंत न राहता नििश्चतपणे घर सोडू शकाल. विभक्त कुटुंब असलेल्यांच्या बाबतीत घर स्वयंचलित करणे आणि त्याच्यावर आपल्या स्मार्टफोनच्या साहाय्याने नियंत्रण राखता येणे शक्य झाल्याने तुम्हाला फारशा मदतीची गरज न लागता घराच्या व्यवस्थापनाचा भार कमी करता येईल.
आता सुरक्षा आणि सुरक्षितता राखणे हे आता जास्त तणावाचे काम राहिलेले नाही; कारण तुम्ही ते एका साधनाच्या साहाय्याने करू शकता. ज्यामुळे एकाच वेळी अनेक कामे करणे सहज आणि सुलभ होते. होम ऑटोमेशनविषयक उपाययोजनांमुळे तुमच्या स्वप्नातील राहणीमान जगता येणे सहज शक्य होणार आहे. आता तुम्ही घरापासून दूर असताना नििश्चत राहून फोनवरील एका क्लिकवरून तुमच्या घराचे नियंत्रण करू शकता.