|| अ‍ॅड. तन्मय केतकर

रेरा कायदा लागू झाल्यापासून प्रत्येक नोंदणीकृत प्रकल्पाची माहिती महारेरा पोर्टलवरती अगदी सहज उपलब्ध आहे. आता प्रत्येक प्रकल्प आणि विकासकदेखील आपापल्या प्रकल्पाच्या माहितीची प्रत संभाव्य ग्राहकांना देत आहेत. महारेरा पोर्टलवर प्रत्येक प्रकल्पाची व्यापक माहिती उपलब्ध आहे आणि त्या सर्व माहितीचे अवलोकन आणि अभ्यास करण्यास बराच वेळ जातो, परिणामी गुंतवणुकीचा किंवा खरेदीचा निर्णयदेखील लांबत जातो. शिवाय जितके अधिक प्रकल्प बघावे तेवढा हा वेळ अजूनच वाढत जातो.

Maharera, housing projects, Maharera news,
राज्यातील २१२ गृहप्रकल्पांबाबत महारेरा साशंक, प्रकल्प सुरू झाले की नाही याची माहितीच महारेराकडे नाही
dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू

हा विलंब टाळण्याकरता प्रकल्पाबाबत माहिती बघून निर्णय घेण्याचे किंवा किमानपक्षी अंतिम निर्णयाकरता प्रकल्पांची निवड करण्याचे जलद साधन असणे आवश्यक आहे. या कामी आपल्याला रेरा नोंदणी प्रमाणपत्र मदत करू शकते. प्रत्येक नोंदणीकृत प्रकल्पाला रेरा नियम ६(अ) नुसार नमुना ‘क’मध्ये नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. हे एकपानी प्रमाणपत्र असून महारेरा पोर्टलवर उपलब्ध असते.

नोंदणी प्रमाणपत्रावर अगदी मोजकी परंतु महत्त्वाची माहिती मिळते. प्रमाणपत्रावर अगदी सुरुवातीला प्रकल्पाचा नोंदणी क्रमांक असतो. या क्रमांकाद्वारे आपण प्रकल्पाची माहिती आणि त्या प्रकल्पाविरोधात काही तक्रारी झाल्या असल्यास त्याच्या आदेशांची माहिती घेऊ शकतो. ज्या प्रकल्पाविरोधात मोठय़ा संख्येने तक्रारी झाल्या असतील, अशा प्रकल्पांचा विचार सोडून देणे श्रेयस्कर ठरते. नोंदणी क्रमांकानंतर प्रकल्पाचे नाव आणि प्रकल्पाच्या जमिनीची माहिती असते. या माहितीने आपल्याला प्रकल्पाच्या नावाची आणि प्रकल्पाच्या ठिकाणाची निश्चित माहिती मिळते. त्यानंतर विकासकाचे नाव दिलेले असते. विकासकाच्या अनुभवाबाबत माहिती मिळवण्याकरता आपण या नावाचा उपयोग करू शकतो.

त्यानंतर खालच्या भागात प्रकल्पाच्या नोंदणीच्या मुदतीबाबत माहिती असते. याद्वारे आपल्याला प्रकल्पाची नोंदणी कधी झाली आणि कधीपर्यंत वैध आहे याची दिनांकासह निश्चित माहिती मिळते. ही माहिती गुंतवणूक आणि खरेदीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. घर खरेदी करताना मुदतीत ताबा मिळणे ही सर्वाधिक महत्त्वाची बाब असते. त्या दृष्टीने आपण प्रकल्प नोंदणी प्रमाणपत्र आणि प्रकल्पातील माहितीचा मेळ घालून बघणे आवश्यक आहे. प्रकल्प माहितीत एकंदर प्रकल्प आणि प्रकल्पातील स्वतंत्र इमारती यांचे किती टक्के काम पूर्ण झालेले आहे, त्याची सविस्तर माहिती दिलेली असते. त्या आधारे प्रकल्पाचे किती काम शिल्लक आहे? आणि उर्वरित काम नोंदणी प्रमाणपत्रातील वैधतेच्या अंतिम तारखेपर्यंत पूर्ण होणे शक्य आहे का? याचा एक अंदाज किंवा ठोकताळा घेणे ग्राहकांच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. नोंदणी वैध कालावधीत प्रकल्प पूर्ण होणे शक्य असल्यास त्यात गुंतवणूक किंवा खरेदी करावी, अन्यथा जो प्रकल्प नोंदणी वैध कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता वाटत नसेल त्या प्रकल्पांचा विचार सोडून देणे ग्राहकांकरता श्रेयस्कर ठरेल. साहजिकच नोंदणी वैधतेच्या आधारे आवडलेल्या प्रकल्पांना चाळणी लावणे ग्राहकांना सोपे जाईल, ज्या प्रकल्पांची वैधता संपुष्टात आलेली आहे किंवा लवकरच संपुष्टात येणार आहे, अशा प्रकल्पांचा विचार सोडून देऊन उर्वरित प्रकल्पांचा विचार करण्याचा निर्णय ग्राहक जलदगतीने घेऊ शकतील.

ग्राहकांप्रमाणेच बँक आणि वित्तीय संस्थांनीदेखील गृहकर्ज देताना याच स्वरूपाची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या घर खरेदीकरता गृहकर्ज द्यायचे आहे त्याचा खरेदी करार रेरा नोंदणी वैध असताना झालेला आहे की नाही? याची खात्री गृहकर्ज देण्यपूर्वीच करणे अत्यावश्यक आहे. प्रकल्पाची रेरा नोंदणी संपुष्टात आल्यावर, त्याचे नूतनीकरण न करता, प्रकल्पातील जागांचे व्यवहार करणे गर आणि बेकायदेशीर ठरत असल्याने, ही काळजी घेणे आवश्यक आहे. याची काळजी न घेतल्यास आणि अवैध घर खरेदीकरता गृहकर्ज दिले गेल्यास त्याच्या वसुलीमध्ये अडचणी येण्याची किंवा ते पसे बुडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, बँक आणि वित्तीय संस्थांनी याबाबतीत योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.

रेरा पोर्टलवरील विविध प्रकल्पांमधून आपल्याला आवडलेल्या प्रकल्पांना अंतिम निर्णयाकरता चाळणी लावताना (शॉर्टलिस्ट करताना) रेरा नोंदणी प्रमाणपत्रावरील थोडक्यात पण महत्त्वाची माहिती ग्राहकांना जलद निर्णय घेण्यास मदत करेल. तसेच ही माहिती कर्ज देणाऱ्या संस्थांनादेखील कर्ज द्यायचे की नाही या निर्णयाप्रत येण्यास मदत करेल.

प्रकल्प माहितीत एकंदर प्रकल्प आणि प्रकल्पातील स्वतंत्र इमारती यांचे किती टक्के काम पूर्ण झालेले आहे, त्याची सविस्तर माहिती दिलेली असते. त्या आधारे प्रकल्पाचे किती काम शिल्लक आहे? आणि उर्वरित काम नोंदणी प्रमाणपत्रातील वैधतेच्या अंतिम तारखेपर्यंत पूर्ण होणे शक्य आहे का? याचा एक अंदाज किंवा ठोकताळा घेणे ग्राहकांच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. नोंदणी वैध कालावधीत प्रकल्प पूर्ण होणे शक्य असल्यास त्यात गुंतवणूक किंवा खरेदी करावी, अन्यथा जो प्रकल्प नोंदणी वैध कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता वाटत नसेल त्या प्रकल्पांचा विचार सोडून देणे ग्राहकांकरता श्रेयस्कर ठरेल.

tanmayketkar@gmail.com