सुभाषिश पटनायक
शहरीकरण वेगाने वाढते आहे. घर खरेदी करणाऱ्यांच्या स्वतःच्या काही कल्पना असतात. त्याप्रमाणे त्यांना आपल्या घराची रचना अनोखी आणि टिकाऊपणा हवा असतो. तसेच आपल्या स्वप्नातील घर वेगाने पूर्ण व्हावे अशीही इच्छा असते. बदलत्या काळानुसार आता बांधकाम क्षेत्रातही अनेक बदल होत आहेत. आणि या बदलाच्या केंद्रस्थानी एक शक्तिशाली, अचूक आणि वाढत्या प्रमाणात सिद्ध झालेले तंत्रज्ञान आहे : 3D प्रिंटिंग. एकेकाळी प्रायोगिक म्हणून पाहिले जाणारे, 3D प्रिंटिंग किंवा ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग हे जागतिक स्तरावर आणि भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातही वेगाने लोकप्रिय होत आहे.
पारंपरिक बांधकाम पद्धतींपेक्षा वेगळे हे 3D प्रिंटिंग म्हणजे आधीच प्रोग्रॅमिंग केलेले डिझाइन आहे. जे सक्षमपणे आणि नजाकतीने तयार साहित्याचा वापर करून घराची रचना करते. परिणामी, या प्रक्रियेत वेळ कमी लागतो. साहित्याचा वापरही कमी होतो आणि आपल्या घराच्या रचनेचे स्वातंत्र्यही मिळते.
ब्लूप्रिंट ते काही दिवसांत घर उभारणीपर्यंत
3D प्रिंटिंगचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे वेग. पारंपरिक बांधकामात ज्या कामांना साधारणपणे महिने लागतात, तीच कामे आता काही दिवसांत करता येतात. ऑप्टिमाइझ्ड आर्किटेक्चरल मॉडेल्स आणि रिएन्फोर्स्ड काँक्रीट मिक्ससह प्रगत 3D प्रिंटर काही दिवसांतच घराचे स्ट्रक्चरल शेल तयार करू शकतात. ही जलद अंमलबजावणी केवळ प्रकल्प वेळेत तयार होण्याला गती देतानाही तर हमखास उशीर होणाऱ्या या क्षेत्रातील एक प्रमुख फरक म्हणून अधोरेखित केला जातो.
अवास्तव खर्च न होणे हादेखील याचा आणखी एक प्रमुख फायदा आहे. अचूक, संगणक-नियंत्रित लेअरिंगसह, तंत्रज्ञान सामानाच्या अति वापराला प्रतिबंध करते. आणि ६०% पर्यंत कचरा कमी करू शकते. योग्य नियंत्रणामुळे स्ट्रक्चरल अचूकता आणि सुसंगतता निश्चित होते आणि कामाची पुनरुक्ती तसेच अकार्यक्षमता टाळते. विकासकांसाठीदेखील हे सोयीचे आहे, कारण यामुळे खर्च आटोक्यात राहायला मदत होते. तर घर घेणाऱ्यांसाठी खर्च केलेल्या पैशांना न्याय मिळणे महत्त्वाचे असते.
निवड आणि कस्टमायझेशनसाठी तयार केलेला पर्याय
वेग आणि बचतीबरोबरच, 3D प्रिंटिंग घराच्या डिझाइनसाठी एक नवीन पर्याय देते : आपल्या आवडीनिवडींना प्राधान्य. पारंपरिक बांधकामामध्ये कमी खर्चाचा विचार असल्याने बांधकामात फारसे वैविध्य नव्हते. पण आता नवीन तंत्रज्ञानामुळे आर्किटेक्ट आणि डेव्हलपर्सना विविध प्रयोग करता येतात. वक्र भिंतींपासून ते बाहेरच्या फिनिशिंगपर्यंत, घरांना आता पर्सनल टच मिळतो आहे.
बांधकामाबाबत मिळालेले हे स्वातंत्र्य घरातील अंतर्गत रचनेतही लागू होते. घराची रचना कशी असावी हे देखील ग्राहक ठरवू शकतात. आपल्या सोयीचे, आवडते आणि अनोखे डिझाइन तयार करण्याची संधी देते. जिन्यांची रचना असो किंवा ओपन-प्लॅन लिव्हिंग स्पेस असो, अभियांत्रिकी अचूकतेसह 3D प्रिंटिंग उत्तम प्रकारचे डिझाइन व्हिजनची साकारते.
टिकाऊपणाला प्राधान्य
टिकाऊपणा हा आता पर्याय नाही; तर ती मूलभूत गरज आहे. 3D-प्रिंटेड गृहनिर्माण प्रामुख्याने पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींचे समर्थन करते. साहित्याचा कार्यक्षम वापर, कमी वाहतूक गरजा आणि ऊर्जेचा कमी वापर यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होतो. शिवाय, या पद्धतीने बांधलेली घरे ही थर्मल रेग्युलेशन, नैसर्गिक वायुवीजन आणि सौर एकात्मता अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर करतात. त्यामुळे इतर कृत्रिम गोष्टींची फारशी गरज भासत नाही.
या पद्धतीने बांधलेल्या घरात नैसर्गिक उजेड असतो, वारा खेळता राहतो तसेच सौर ऊर्जेचादेखील वापर होतो. त्यामुळे या माध्यमातून विकासक वाढत्या प्रमाणात जागतिक शाश्वतता बेंचमार्कची पूर्तता करतात. यात अनेक UN शाश्वत विकास उद्दिष्टांचा (SDGs) समावेश आहे. यामुळेच 3D प्रिंटिंग पर्यावरणीय जबाबदारी आणि व्यावसायिक कामगिरी यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे.
भारताची गती
3D-प्रिंटेड गृहनिर्माण पर्यायाचा शोध घेण्यात आणि त्यांचा अवलंब करण्यात भाारत आघाडीवर आहे. Tvasta सारख्या या क्षेत्रातील प्रवर्तकांनी एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत राहण्यायोग्य उत्तम घरे यशस्वीरित्या बांधली आहेत, ज्यामुळे विविध स्तरावर तंत्रज्ञानाची व्यवहार्यता दिसते. परवडणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण गृहनिर्माण मॉडेल्समध्ये धोरणात्मकतेसह भारतीय मार्केटला बांधकामातील ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगच्या जागतिक उत्क्रांतीत एक प्रमुख स्थान मिळण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, पुण्यासारख्या उच्च मागणी असलेल्या शहरांमध्ये अनेक विकासक व्हिला आणि सॅम्पल युनिट्ससाठी 3D प्रिंटिंग स्टार्टअप्ससोबत सहकार्य करत आहेत. मुख्य प्रवाहातील सहभागसह प्रयोगापासून अंमलबजावणीकडे वळण्याचे संकेत हे उपक्रम देतात.
शहरी जीवनाचे भविष्य सक्षम करणे
मोठ्या प्रमाणात अंमलबजावणीसाठी बिल्डिंग कोडमधील अपडेट्स, छपाईच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढलेली गुंतवणूक आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असली तरी दिशा स्पष्ट आहे. पुढील दशकात लाखो शहरी घरे बांधण्याच्या तयारीत असलेल्या देशासाठी, जलद, स्मार्ट आणि अधिक टिकाऊ बांधकाम पद्धतींचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे.
3D प्रिंटिंग ही आता भविष्यकालीन संकल्पना राहिलेली नाही. रिअल इस्टेट डेव्हलपर्ससाठी ते एक व्यावहारिक, शक्तिशाली साधन आहे. जे इतरांपासून वेगळे तर करतेच पण नवीन उपक्रम राबवणे तसेच जलद वितरणाचे उद्दिष्ट ठेवतात. वाढत्या शहरीकरणात सानुकूलित, समकालीन आणि पर्यावरण-जागरूक घरांची भारताची वाढती गरज ते वेगाने पूर्ण करते.
