दिवाणखान्यात इंटिरियरमध्ये सर्वात दुर्लक्षित राहिलेला घटक म्हणजे कॉर्नर टेबल. मागील लेखात आपण सेंटर टेबलसंबंधी माहिती घेतली. या लेखात आपण कॉर्नर टेबलसंबंधी माहिती घेऊया. यात दोन प्रकार आहेत. ते म्हणजे कॉर्नर टेबल व साइड टेबल. इंग्रजी एल आकाराच्या सोफा सीटिंगमुळे व इंग्रजी ‘सी’ आकाराच्या सोफ्यामुळे तयार होणाऱ्या कोपऱ्यांमध्ये ठेवले जाते- ते आहे कॉर्नर टेबल. कॉर्नर टेबलचा वरचा भागा (टॉप) हा कॉर्नर टेबलच्या इतर अंगापेक्षा जास्त दृष्टीस पडतो म्हणून तो चांगल्या प्रतीचा असणे फार गरजेचे आहे. तसेच हा वरचा भाग सेंटर टेबल व साइड टेबलला साजेसा असावा. जर आपला सोफा हा फुल्ली अपहोल्स्टर्ड (कापड, लेदर, रेक्झीन, इ. ने भरलेले) (fully upholstered) प्रकारचा असेल अर्थात संपूर्णपणे अपहोल्स्ट्रीने झाकलेला असते. अशा प्रकारच्या सोफ्यामध्ये आर्मरेस्टच्या बाजूने कॉर्नर टेबल दिसत नाही, पण सोफा जर मोकळ्या चौकटीचा (ओपन फ्रेम) असेल तर बाजूने कॉर्नर टेबलचा केवळ वरचाच भाग नव्हे तर कॉर्नर टेबलचे इतरही भाग बऱ्यापैकी दिसतात. कारण अशा प्रकारच्या सोफ्यामध्ये आर्मरेस्टवर कोणत्याही प्रकारचे कुशनिंग केले जात नाही. कॉर्नर टेबल हे बहुतांश वेळेस चौरसाकृती असते, पण आयत, गोल व लंब गोल आकारातही हे टेबल बनवता येते. चार पाय असलेले ओपन, डिझाइनर स्टँड असलेले बॉक्स प्रकारातील अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण कॉर्नर टेबल बनवू शकतो.

धातू किंवा दगडाच्या माध्यमात तयार केलेली शिल्पे ही या कॉर्नर टेबलचा सपोर्ट म्हणून वापरता येतील. चार पायांचे ओपन कॉर्नर टेबल असेल तर त्याचे पाय सुंदर पॉलिश केलेले असावेत. जर बॉक्स कॉर्नर टेबल असेल तर त्या टेबलच्या कडा व्यवस्थित फिनिश केलेल्या असाव्यात व हे फिनिश सेंटर टेबल, साइड टेबल तसेच सोफा सेटला साजेसे असावे. बॉक्स कॉर्नर टेबलचा वरचा भाग हा मोकळा असावा. कारण टेबलाच्या दोन बाजूस भिंती व उरलेल्या दोन बाजूस सोफा असल्याने कोणत्याही बाजूने उघडणारे दार बनवता येत नाही. बहुतांश वेळेस टेबलाचा वरचा भाग हा काचेचा असल्याने जड होतो. हा वरचा भाग सहज उघडण्यासाठी हायड्रॉलिक ब्रॅकेट्स लावावीत. अशा प्रकारच्या टेबलमध्ये तयार होणाऱ्या बॉक्समध्ये आपण मासिक, जुनी वर्तमानपत्र, इ. ठेवू शकता. हा प्रकार दिसावयास तितकासा छान नसला तरी खूप उपयुक्त ठरतो. अपहोल्स्टर्ड प्रकारच्या सोफा सेटस्बरोबर असे बॉक्स प्रकारातले कॉर्नर टेबल बनवण्याचे प्रमाण जास्त आहे.

dubai flood effect
पुरामुळे अस्ताव्यस्त झालेल्या युएईला पूर्वपदावर आणायला किती खर्च येणार?
Nagpur, Jyoti Amge, World's Shortest Woman, World's Shortest Woman voting, World's Shortest Woman in nagpur, lok sabha 2024, polling day, nagpur news, guinness book
जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे नागपुरात मतदान
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?

कॉर्नर टेबलचा आकार हा सोफ्याच्या डेप्थवर (सोफ्याचे भिंतीपासूनचे अंतर) अवलंबून असतो. सोफ्याची डेप्थ साधारणपणे दोन ते अडीच फूट इतकी असते. या पेक्षा तीन इंच कमी आकाराचे कॉर्नर टेबल बनवावे. उदा. सोफ्याची डेप्थ अडीच फूट आहे. हा सोफा सेट इंग्रजी ‘एल’ आकारात ठेवलेला असेल तर अडीच फूट x अडीच फूट आकाराचा मोकळा चौकोन तयार होतो. अडीच फूट x अडीच फूट म्हणजेच तीस इंच x तीस इंच. या मोकळ्या जागेत तीस इंचापेक्षा निदान तीन इंच कमी म्हणजेच सत्तावीस इंच x सत्तावीस इंच या आकाराचे कॉर्नर टेबल बनवावे. यापेक्षा त्याचा आकार वाढवू नये. उलट थोडा कमी केल्यास हरकत नाही. कॉर्नर टेबलची उंची ही सोफ्याच्या सीटच्या उंची इतकीच असावी. साधारणपणे सोफ्याच्या सीटची उंची सोळा ते अठरा इंच इतकी असते. त्याप्रमाणेच कॉर्नर टेबलची उंची असावी.

उंची व आकारामध्ये हे निकष साइड टेबललाही लागू पडतात. जागा जास्त असल्यास साइड टेबलची लांबी आपण वाढवू शकतो, पण कॉर्नर टेबल इतकेच साइड टेबल असल्यास दिसावयास चांगले दिसते. कॉर्नर टेबल हे ‘एल’ किंवा ‘सी’ शेप्ड सोफासेटबरोबरच घेता येते, पण साइड टेबल हे ‘एल’, ‘सी’ ‘यू’, सिंगल, पॅरेलल अशा प्रत्येक प्रकारच्या सोफासेटबरोबर घेता येते. साइड टेबल पूर्णपणे दिसत असल्याने ते सुंदररित्या सजावट करणे आवश्यक आहे. साइड टेबल वापरण्याचे प्रमाण कमी आहे, पण वापरल्यास छान दिसते.

साइड टेबल व कॉर्नर टेबलवर लॅम्प शेड, शिल्प, फुलदाणी, फोटोफ्रेम, छोटी रोपटी अशा बऱ्याच प्रकारच्या वस्तू ठेवता येतात व शोभा वाढवता येते. पण  त्याचा अतिरेक टाळावा. मोजक्याच शोभिवंत वस्तू कलात्मकरित्या मांडाव्यात. सेंटर टेबलप्रमाणेच कॉर्नर टेबल व साइड टेबलकडेही एक महत्त्वाचा घटक म्हणून पहावे व योग्यरित्या सजवलेले असावे. आपल्या दिवाणखान्याची सजावट देखणी दिसेल.

अजित सावंत (इंटिरियर डिझायनर)

ajitsawantdesigns@gmail.com