स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. डोक्यावर हक्काचं एक छप्पर असणं याला मानवी जीवनात किती महत्त्वाचं स्थान आहे हे काही नव्याने सांगायला नको. आणि याच आपल्या घराच्या छताला अंतर्गत सजावटीत किती महत्त्वाचं स्थान असतं, हे यातील तज्ज्ञ व्यक्तीला वेगळं सांगण्याची गरज नसते, ते त्याला अचूक माहीत असतं. घराच्या छताला (सीलिंगला) सौंदर्यपूर्णरीत्या सजवण्यासाठी फॉल्स सीलिंग आवश्यक आहे.आ पल्या डोक्यावर एक हक्काचं छप्पर असावं, म्हणजेच स्वत:चं घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी प्रत्येक जण जिवाचं रान करीत असतो. या छताला (घराला) मानवी जीवनात किती महत्त्वाचं स्थान आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. तर असं हे छप्पर किंवा छत जसं माणसासाठी गरजेचं असतं तसंच ते अंतर्गत सजावटीतसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. संपूर्ण घराबरोबरच या छताला सुंदररीत्या सजवण्यासाठी, एक आकर्षक लुक देण्यासाठी फॉल्स सीलिंग करणं आवश्यक असतं.फॉल्स सीलिंग म्हणजे प्रत्येक खोलीच्या मूळ सीलिंगला (छताला) झाकून टाकणारं एक आभासी किंवा खोटं सीलिंग. हे सीलिंग दिखाव्याचं, देखणं सीलिंग असतं. ते करण्यामागचा उद्देश हा की छताला एक उठाव आणि वेगळा लुक मिळायला हवा. तसंच वर छताकडच्या इलेक्ट्रीकल पॉइंट्स, वायर्स कन्सिल्ड करण्यासाठी, एसीचे डक्स् हाइड करण्यासाठी फॉल्स सीलिंग खूप उपयोगी पडतं. अनेकदा खोलीची उंची जास्त असते. अशा वेळी ती कमी करण्यासाठीसुद्धा त्याचा उपयोग होतो. तसंच खोल्यांच्या वरच्या बाजूस असलेले बिम्स अतिशय खराब दिसतात. घराच्या इंटीरिअरला, त्या त्या खोलीला ते बाधक ठरतात अशा वेळी हे बिम्स झाकण्यासाठी फॉल्स सीलिंगचा वापर करता येतो. उन्हाची तीव्रता आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ज्यांचं घर टॉप फ्लोअरला असतं अशांना तर घरातही उन्हाच्या तप्त झळा सहन कराव्या लागतात. घराच्या वर गच्ची असलेल्यांनी उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी म्हणून फॉल्स सीलिंग नक्की करून घ्यावं. तसंच फॉल्स सीलिंगच्या आतल्या बाजूस थर्मोकॉलचा वापर करून उन्हाची तीव्रता कमी करता येते. थर्मोकॉल हे उष्णतारोधक असल्याने त्याचा वापर निश्चितच फायदेशीर ठरतो. बंगला, रो हाऊससाठीसुद्धा अशा प्रकारचं फॉल्स सीलिंग बनवतात. फक्त घरासाठीच नव्हे तर ऑफिस, शॉप्स, मॉल्समध्येही फॉल्स सीिलग करता येतं. वैविध्यपूर्ण आकारात फॉल्स सीलिंग करून तिथे वेगवेगळ्या लाइट्सची रचना, विविध रंगांचा किंवा टेश्चरचा वापर करून सीिलग आकर्षक करता येतं. आता सीलिंगच्या टेक्निकल गोष्टीकडे एक नजर टाकू या. हे फॉल्स सीलिंग पीओपी शिट्स, जिप्सम बोर्ड, लाकूड-प्लायचा वापर करूनसुद्धा बनवता येतं. तसंच हव्या त्या ठिकाणी काच, स्टेन ग्लास, मिररचा वापर करूनही फॉल्स सीलिंग तयार केलं जातं. बाजारात काही कंपन्यांच्या फॉल्स सीलिंगच्या तयार टाइल्सही मिळतात. या टाइल्स वजनाला हलक्या आणि टिकाऊ आहेत. या सीलिंगच्या टाइल्स लाकडाचा भुसा, उसाच्या सालांचा कोंडा यांच्या मिश्रणातून बनविल्या जातात. या टाइल्स आकाराने लहान असतात, साधारणत: एक फूट बाय चार फूट, तसंच दोन फूट बाय दोन फूट. काही जणांना साऊंड प्रूफ टाइल्स हव्या असतात. तर त्याही बाजारात मिळू शकतात. शिवाय यामध्येच अॅल्युमिनियम, स्टील या मटेरिअल्समधील टाइल्ससुद्धा उपलब्ध आहेत. संपूर्ण छताला फॉल्स सीलिंग नको असेल तर सीलिंगचा एखादाच भाग फॉल्स सीिलग करून छान ठसठशीत बनवून घेता येतो. उदाहरणार्थ, हॉलमध्ये डायिनग किंवा बठकीच्या वरचं सीिलग डिझाइन करून घेता येतं. घराच्या किंवा एकूण कोणत्याही वास्तूच्या सीलिंगला एक उठाव आणण्यासाठी फॉल्स सीिलग केलं जातं. घराचं नखशिखांत सौंदर्य हवं असेल तर फॉल्स सीलिंग इज अ मस्ट!