शं. रा. पेंडसे

घराच्या जागी सहा मजली इमारत होती. मागे गोठा नव्हता. पण कुंपणावर लिटीचं झाड मोठय़ा डौलाने उभे होते. जणू ते मला सांगत होते अरे, तू नक्की मला भेटायला येशील याची मला खात्री होती. आम्ही झाडाखाली उभे असताना आवाज आला. जान्हवीच्या पायाशी लिटीचा आंबा पडला होता. तिने झटकन तो उचलला आणि हृदयाशी धरला. तिच्या डोळय़ांतले अश्रू त्या आंब्यावर पडत होते. मीही तो आंबा हातात घेतला.

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका

लिटीचा आंबा आमच्या आणि धारप यांच्या कुंपणावर आहे. त्यामुळे मालकी आम्हा दोघांची आहे. पण धारप कधी त्या छोटय़ा तुकडय़ावर फिरकतसुद्धा नाहीत म्हणून वहिवटीने हा आंबा आमचाच असे आम्ही समजतो. त्याला आंबा म्हणायचं की आंबुटला हेच कळत नाही. त्याला लिटीचा आंबा हे नाव कुणी दिलं हे काही वर्षांपूर्वी मी गावातल्या काकूंना विचारलं होतं. त्या म्हणाल्या, ‘‘हत मेल्यांनो, त्याला नावं कसली देता? खाऊन बघा. आंब्याची चव चाखल्या शिवाय नाही. आंबा कसा चवीने खावा. तुमच्या अलफान्सो म्हणजे हापूस आंब्याला मागे टाकील अशी लिटीच्या आंब्याची चव आहे.’’

 हाताच्या चार बेटात मावेल असा याचा आकार असतो. याची एक खासियत म्हणजे,  त्याला झाडावरून उतरावयाचा नसतो. तो झाडावरच पिकतो आणि पूर्ण पिकला की आपोआप गळून पडतो. आंबा पडल्याचा आवाज ऐकून जो कोणी धावत पळत जाऊन तो आंबा प्रथम वेचतो तो त्याचा मालक. मोठी माणसं त्याकडे ढुंकूनसुद्धा पाहात नाहीत. पोरंसोरं त्या आंबुटल्याकरिता भांडत असतात. कारण तुमच्या हापूसप्रमाणे कापून खाण्याचा हा आंबा नाही. झाडावरून पडलेल्या या आंब्याला स्वत:च्याच सदऱ्याने पुसून सरळ तोंडात घालून रस चोखायला सुरुवात करायची ती त्या आंब्याची चिफाड होईपर्यंत. त्यावेळी खरी गंमत असते ती खाणाऱ्याची / आंबा चोखणाऱ्याची- जी ब्रह्मानंदी टाळी लागते ती कुणी भंग करू शकत नाही. लिटीचा हा आंबा खाणे हा ‘एकपात्री’ प्रयोग असतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही.  या आंब्याचा दुसरा काही उपयोग नाही. शहरातून वा परदेशांतून कोकणात आलेले बच्चे लोक जेव्हा जास्त गोंगाट करून त्रास द्यायला लागतात, तेव्हा आजी-आजोबा त्यांना लिटीच्या आंब्याखाली बसायला सांगतात. मुलांचं नशीब असेल तर दोन-चार आंबे पडतातसुद्धा. असे मिळालेले आंबे खाण्यातसुद्धा गंमत असते.

गावचे लोक त्याला गैरी आंबा या नावे ओळखतात. लिटीच्या आंब्याला साधारण एप्रिलमध्ये सुरुवात होते आणि पाऊस पडेपर्यंत हा आंबा येत असतो. देवगडचा राजा हापूस हा जेव्हा ऐन बहरात असतो तेव्हा सर्वाचे लक्ष हापूसकडे असतं. कुठंही गेलात बेत काय आहे याचं उत्तर आमरसपुरी हेच येत असतं. मग साध्या आंब्याची साठं घालण्याचे उद्योग चालू होतात. चार-चार कामकरणी सबंध दिवसभर आंब्याचा रस काढत असतात, तर दुसऱ्या दिवशी तोच रस स्टेनलेस ताटामध्ये पसरून अंगणांतल्या पत्राच्या मांडवावर ती ताटं उन्हात सुकविण्याकरिता ठेवली जातात.

आता तर रस सुकवण्याकरिता इलेक्ट्रिक ओव्हनचा उपयोग होतो. स्टेनलेसच्या ट्रेमध्ये रस पसरून ते ट्रे ओव्हनमध्ये ठरावीक तापमानाला ठेवले जातात. याकडेसारखं लक्ष द्यावं लागतं. तो रस सुकला की त्याच्या जरुरीप्रमाणे वडय़ा पाडून खोक्यामध्ये पॅक करतात. सबंध वर्षभर ही आंबापोळी विक्रीकरता उपलब्ध असते. लिटीच्या आंब्याचं झाड किती जुनं आहे हो? अहो, आमचं सारं बालपण हे लिटीचे आंबे खाण्यात गेलं. आमच्या वाडीत अशी चार झाडे आहेत, पण लिटीच्या आंब्याची सर कुणाला येत नाही. काहींना दरवर्षी फळे येत नाहीत. काहींचा एखाद्या वर्षी मोहोरच गळून पडतो. पण लिटीचा आंबा मात्र दरवर्षी फळे देत असतो.

लिटीचा आंबा आमच्या घराजवळच आहे. घरापाठी मागे गोठा आहे. गोठय़ाजवळच कुंपणावर लिटीचा आंबा आहे. परवा वॉशिंग्टन येथे राहणाऱ्या जान्हवीचा- आते बहिणीचा मेल आला. ती पाच-सहा वर्षांनंतर कोकणात येणार होती. जुन्या आठवणी निघाल्या. ते मोठ्ठं घर, पाठीमागची वाडी लिटीचा आंबा. मी तिला मेल करून लिहिलं- जान्हवी, ते घर आता विकलं गेलं आहे. जुन्या घराऐवजी आधुनिक ब्नाही. ‘अरे, लिटीचं झाड तरी आहे ना?’ जान्हवीचा परत मेल. मी तिला म्हटलं, चार वर्षांत मी गावाला गेलो नाही. जान्हवी म्हणाली, ‘मग परिसर तर पाहून येऊ.’ जान्हवी आल्यावर मी तिला आमच्या घराच्या परिसरात घेऊन गेलो. घराच्या जागी सहा मजली इमारत होती. मागे गोठा नव्हता. पण कुंपणावर लिटीचं झाड मोठय़ा डौलाने उभे होते. जणू ते मला सांगत होते- ‘अरे, तू नक्की मला भेटायला येशील याची मला खात्री होती.’

आम्ही झाडाखाली उभे असताना आवाज आला. जान्हवीच्या पायाशी लिटीचा आंबा पडला होता. तिने झटकन तो उचलला आणि हृदयाशी धरला. तिच्या डोळय़ांतले अश्रू त्या आंब्यावर पडत होते. मीही तो आंबा हातात घेतला. आमच्या दोघांच्या ‘अश्रूंनी’ तो लिटुकला भिजला होता.