सुरेख भवताल, मुबलक नैसर्गिक सौंदर्य आणि थंड हवामान.. या गोष्टी अगदी मोठय़ातला मोठा ताणही हजका करतात. जलद गतीने वाढणाऱ्या पायाभूत सुविधा, मेट्रोपॉलिटन व्यवसाय असलेल्या जिल्ह्यंमध्ये जोडले जाण्याचे विविध पर्याय, सर्वोत्तम अशा सार्वजनिक सुविधा आणि भरपूर नोकरीच्या संधी यांच्या समीकरणामुळे काही शहरे निवासासाठी महत्त्वाची ठरतात. दूरदृष्टी ठेवून योग्य वेळेस अशा मुख्य ठिकाणी योग्य वेळी गुंतवणूक महत्त्वाचे ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर महाराष्ट्रातील नवीन जिल्हा असून, पश्चिम मार्गावरील गजबजत्या मुंबई-अहमदाबाद भागावर स्थित आहे. यात आठ तालुक्यांचा समावेश होतो, शिवाय वसई-विरार (मुंबई-मेट्रोपोलिटिन रिजन- एमएमआरचा जलद विकसित होणारा भाग) आणि बोईसरचे औद्योगिक केंद्र यांचाही समावेश होतो. पालघर नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. येथे वीकेण्डला येणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. हे ठिकाण किल्ले, रिसॉर्ट, सुरेख समुद्रकिनारे आणि आदिवासींच्या कलाविष्कारासाठी प्रसिद्ध आहे.

पालघरविषयी अधिक जाणून घ्यायचे म्हणजे, हा जिल्हा विविध प्रकारे जोडला गेलेला आहे. रस्ते आणि रेल्वेची उत्तम सुविधा असलेले पालघर एमएसआरटीसी (महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन)चे विभागीय प्रमुख आहे. अंधेरी (मुंबई)सारख्या व्यावसायिक ठिकाणाहून येथे पोचायला ट्रेनने केवळ ९० मिनिटे लागतात, पश्चिम रेल्वे लाइनवरील पालघर हे एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे, तसेच दैनंदिन स्तरावर स्थानिक लोक मुंबईत जाण्या-येण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर शटल/मेमु/इएमयू (लोकल ट्रेन्स) सेवा वापरतात. अनेक लांब पल्लय़ाच्या गाडय़ा पालघरला थांबतात आणि गुजरात पट्टय़ातील काही गाडय़ाही थांबतात. एनएच ८ हा मुंबई ते अहमदाबादला जोडणारा महामार्गही जवळच आहे. याबरोबरच भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (एमएएचएसआर) प्रकल्पातही पालघरमध्ये थांबा करण्याचे प्रस्तावित आहे.

महाराष्ट्र प्रशासनाने पालघरमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले असून, जिल्ह्यतील मुख्यालये म्हणून रचना करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. यात अधिवास, व्यावसायिक, मिश्र वापरासाठी आणि औद्योगिक विभाग विकास यांचा समावेश आहे. सिडको (सिटी इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉपरेरेशन)ची पालघरच्या नव्या शहर विकास प्राधिकरण आणि इमारतींची उभारणी व जिल्हास्तरीय आवश्यक कार्यालयांच्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कम्युनिटी सेंटर, पाण्यासाठी विकास कामे आणि बागबगिचांची उभारणी यांच्या बांधणीचीही शहराच्या दृष्यात्मक स्वरूपासाठी अपेक्षित आहे.

पालघर हे प्रमुख औद्योगिक ठिकाण आहे राज्यात सर्वात मोठे एमआयडीसीचे (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉपरेरेशन) पर्याय उपलब्ध असल्याने, पालघर जिल्हा जीवनशैलीसाठी अनेक पर्याय देऊ  शकतो. तारापूर येथील एमआयडीसी म्हणजे तब्बल १३०० प्रक्रियेतील उद्योग युनिट, अगदी टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील आणि रेमंडसारख्या जागतिक कॉर्पोरेशन्ससाठीचे माहेरघर आहे. पालघर जिल्ह्यत अनेक लहान-मध्यम आकाराचे उद्योग आहेत, जे तब्बल १.५ लाख लोकांना रोजगाराच्या संधी देतात. याशिवाय, डहाणूमध्ये नव्या शिपिंग टर्मिनल प्लॅन होत असून, हा पालघर जिल्ह्यचाच भाग आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे मासेमारी केंद्र, सातपाटी असून, ते पालघर रेल्वे स्टेशनपासून ८ किमी अंतरावर आहे.

तसेच सर्व महत्त्वाच्या सुविधा पालघरमध्ये उपलब्ध आहेत. यात शैक्षणिक संस्था (प्राथमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालये), हॉस्पिटले, शॉपिंग सेंटर, सिनेमाघरे, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स यांचा समावेश आहे. तसेच डीमार्ट आणि बिग बाझारसारखे प्रमुख रिटेल ब्रँड अगदी जवळच आहेत, आणि या सर्व सुविधा विकासाच्या निदर्शक आहेत.

महाराष्ट्राचा ३६वा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्यतून पालघरची निर्मिती झाल्यापासून तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे, या अल्पकाळात औद्योगिक ठिकाण म्हणून फारच चांगली प्रगती झाली आहे. पायाभूत सुविधांचा विकास आणि इतर सामाजिक-आर्थिक असा हा विकास झालेला आहे. सध्याच्या स्पर्धात्मक दरांमध्ये पालघरमधील रिअल इस्टेटचे दर सुयोग्य आहेत, काही काळानंतर गुंतवणूकदारांना त्याचे सर्वोत्तम फायदे मिळू शकतील, कारण एक चांगले निरोगी व संतुलित जीवनशैली मिळवण्याचे ठिकाण उत्तम पर्यावरणासह आपल्याला प्राप्त होत आहे.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modern facilities management
First published on: 19-05-2018 at 00:02 IST