गौरी प्रधान ginteriors01@gmail.com

इ  जिप्त आणि तिथले पिरॅमिड्स हे नेहमीच

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : दावा हास्यास्पद; पण दुर्लक्ष नको..
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड
fire broke out in vasai industrial estate
वस‌ईच्या औद्योगिक वसाहतीत भीषण आग; औद्योगिक कचऱ्यामुळे आग लागल्याचा शक्यता

जगासाठी कुतूहलाचे विषय राहिलेले आहेत.

त्यातही गिझाचे पिरॅमिड्स हे तर जगातील सात आश्चर्यामध्ये आपले स्थान टिकवून आहेत. पिरॅमिड्सच्या भोवती जितक्या गूढ रंजक कथा गुंफल्या गेल्या आहेत त्याहीपेक्षा ते प्रसिद्ध आहेत त्यात वापरल्या गेलेल्या वास्तू विज्ञानासाठी. आज माणसासाठी जिथे आकाशही ठेंगणे झाल्यासारखे वाटते, तिथे काही कोडी आजही माणसाला तितकीच बुचकळ्यात टाकतात. अर्थात त्याची बांधणी, त्याचा आकार या झाल्या वास्तुविशारद कलेशी संबंधित गोष्टी. याचा इंटिरियर डिझाइनशी काय संबंध, असा एक साहजिक प्रश्न तुमच्या मनात डोकावून गेलाच असेल. पण संबंध आहे. गिझाच्या पिरॅमिडच्या अनेक वैशिष्टय़ांपैकी एक म्हणजे त्याच्या भिंतींना आतील बाजूने प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पी. ओ. पी.चा गिलावा म्हणजेच प्लास्टर केलेले आहे आणि अनेक शास्त्रज्ञांसाठी तो फार मोठा कुतूहलाचा विषय आहे.

आज आधुनिक युगातदेखील प्लास्टर ऑफ पॅरिस इंटिरियर डिझाइनच्या क्षेत्रात आपले महत्त्वाचे  स्थान टिकवून आहे. प्रथम आपण प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे नेमकं आहे तरी काय हे थोडक्यात जाणून घेऊ. सर्वसामान्य भाषेत आपण याला पी. ओ. पी. असे संबोधतो. तर त्याचे खरे नाव आहे जिप्सम. हा पदार्थ कॅल्शिअम सल्फेटपासून तयार होतो आणि पॅरिसच्या आजूबाजूच्या टेकडय़ांवर मुबलक प्रमाणात मिळतो म्हणूनच याला प्लास्टर ऑफ पॅरिस असे म्हटले जाते.

इंटिरियर करत असताना भिंतींना सिमेंट रेती वापरून प्लास्टर केले जाते हे तर आपणा सर्वाना माहीतच असेल. त्यामुळे भिंतींना ताकददेखील मिळते. पण इंटिरियर करत असताना मजबुती जितकी महत्त्वाची तितकेच देखणेपणही! पी. ओ. पी. आपल्या भिंतींना देखणेपण देते. भिंतीवर पी. ओ. पी. लावण्याचे दोन प्रकार आहेत. एका प्रकारामध्ये ज्या प्रकारे भिंतीवर पुट्टी भरली जाते अगदी तसेच पत्र्याने पी. ओ. पी.चा पातळ थर भिंतीवर लावला जातो. दुसऱ्या प्रकारात ओळंब्याचा वापर करून भिंतीवर पी. ओ. पी.चा जाड थर चढवला जातो. यात पहिल्या प्रकारापेक्षा दुसरा प्रकार इंटेरिअरच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचा. सिमेंट रेतीचा वापर करून प्लास्टर केलेल्या भिंती काही ठिकाणी वरखाली, ओबडधोबड दिसतात. कारण कितीही ओळंब्याचा वापर केला तरीही सिमेंट रेतीचे प्लास्टर गुळगुळीत एकसारखा पृष्ठभाग नाही बनवू शकत, आपण याला त्याची एक त्रुटी म्हणू शकतो. यांचे कानेकोपरेदेखील काटकोनात सरळ रेषेत असत नाहीत. पण तेच ओळंबा धरून पी. ओ. पी. केल्यास खोलीचे कानेकोपरे अगदी पट्टीने आखल्यासारखे सरळ रेषेत दिसतात आणि भिंतीदेखील एकसंध सपाट दिसतात. याचा परिणाम आपल्याला रंगकाम झाल्यावर खऱ्या अर्थाने दिसतो. साधारण प्लास्टर केलेल्या भिंतीवर लाइट्स लावले की रंगावर वरखाली होणाऱ्या वळ्या दिसून येतात तर पी. ओ. पी. केलेल्या भिंतीवर प्रकाश एक सलग पसरतो, त्यामुळे भिंतीचा रंगही खुलून दिसतो.

पी. ओ. पी.मुळे घराचे सौंदर्य वाढते, हा झाला त्याच्याबाबतचा एक भाग, पण त्याचसोबत आणखी त्याचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे अग्निरोधकता. याच्या या गुणामुळेच घरात आग लागली असता ती इकडेतिकडे पसरण्यास प्रतिबंध होतो. तसेच घराच्या भिंती व त्यातून केलेले कन्सिल्ड वायिरग व बीम कॉलम यातील पोलाद सुरक्षित राहून इमारतीची होणारी मोठी हानी टळते.

पी. ओ. पी. ज्याप्रमाणे भिंतीवर लावू शकतो तसेच छतालाही याचा गिलावा करता येतो. हे वजनाने हलके असल्यामुळे याचा जाड थर जरी भिंतीवर आला तरी भिंतीवर अतिरिक्त भार पडत नाही. सिमेंट प्लास्टरशी तुलना करता पी. ओ. पी.मध्ये काम करणेही तसे सोपे. यात पी. ओ. पी.ची जी तयार पूड मिळते त्यात फक्त योग्य प्रमाणात पाणी मिसळले की लागलीच कामाला सुरुवात करता येते. पण त्याचसोबत एक खबरदारीही घ्यावी लागते. पी. ओ. पी. पटकन सुकून कडक होत असल्याने काम करताना जलद गतीने करावे लागते. पी. ओ. पी.चा आणखी एक महत्त्वपूर्ण गुणधर्म म्हणजे ते चटकन एखाद्या साच्याचा आकार घेते. याच्या याच गुणधर्मामुळे मूर्तिकामात वैगेरे याचा बराच वापर करून घेतला जातो. याच गुणधर्माचा फायदा उचलत घरातील छताच्या कोपऱ्यांवर लावण्यासाठी कॉन्रेस तसेच छतावरील नक्षीकामदेखील पी. ओ. पी.चा वापर करून सहज केले जाते.

पी. ओ. पी.पासून बनवलेल्या मोठमोठय़ा शीट वापरून घरात फॉल्स सीलिंगदेखील बनवली जातात. फॉल्स सीलिंगचा उपयोग बऱ्याच अंशी घरातील तापमान नियंत्रित करणे, छताचे सौंदर्य वाढवणे व घराची अतिरिक्त उंची कमी करणे यासाठी केला जातो. फॉल्स सीलिंगविषयी विस्ताराने आपण पुढे कधीतरी बोलूच. तूर्तास पी. ओ. पी.च्या शीट वापरून फॉल्स सीलिंग बनवणे अगदी सोपे आणि झटपट असते हेच आपल्यासाठी महत्त्वाचे.

स्वयंपाकखोली तसेच न्हाणीमध्ये तसेच फार ओल येणाऱ्या भिंतींवर मात्र पी. ओ. पी.च्या वापरावर मर्यादा येतात. पण एरवी कोणतीही विषारी द्रव्ये नसलेले आणि आरोग्यास घातक न ठरणारे पी. ओ. पी. भिंतींना एका वेगळाच साज चढवते. सिमेंट प्लास्टरच्या तुलनेत बाहेरील थंड-गरम वातावरणाला तोंड देण्याची याची क्षमताही जास्त असते, त्याचाच परिणाम म्हणून पी. ओ. पी. केलेल्या भिंतींना तडे जाण्याचे प्रमाणही फारच कमी असते.

(इंटिरियर डिझायनर)