सुचित्रा साठे

काळाबरोबर परिस्थिती बदलत जाते, जीवनमान बदलते, असुरक्षितता वाढत जाते. वाडा, चाळ संस्कृती नामशेष होते. बीएचके संस्कृती रुजू लागते. घराला असलेल्या मागच्या आणि पुढच्या दोन दारातलं एक दार हळूच नाहीसं होतं. सगळा भार पुढच्या एकाच दारावर पडतो. कडीकोयंडय़ाबरोबरच अ‍ॅटोमेटिक लॅच दाराला लावले जाते; नाकात वेसण घालावी ना तसे. पूर्वी कोणी आले की येणारी व्यक्ती दाराची कडी वाजवायची. परंतु ब्लॉक सिस्टीम चालू झाल्यापासून दोन कोयंडय़ामुळे कडी कुलुपासकट हालचाल न करता स्तब्ध राहू लागलेली असते. त्यामुळे दाराच्या चौकटीत बेल हजर झाली. वेळीअवेळी बेल वाजली की कोण आलं असेल हे प्रश्नचिन्ह उभं राहतं.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

घर म्हणजे भोवतालच्या परिसरातून स्वत:ला वेगळं करण्यासाठी, स्वातंत्र्य जपण्यासाठी चार दिशांना उभारलेल्या एकमेकांशी जोडलेल्या भिंती आणि भिंतीच्या डोक्यावर छप्पर घालून निर्माण झालेली हक्काची सुरक्षित जागा. या जागेत जा-ये करण्यासाठी, सर्वसाधारणपणे पुरुषभर उंचीपेक्षा थोडी जास्त (सहा ते सात फूट) आणि अडीच तीन फूट रुंदीची भिंतीत कोरलेली जागा म्हणजे दाराची किंवा दरवाजाची जागा. या जागेतून माणसांबरोबरच हवा उजेडही आत डोकवत असतो. ही जागा उघडी ठेवता येणार नाही. उघडी ठेण्यात काही अर्थही नाही म्हणून ती बंद करण्यासाठी दार किंवा दरवाजा अस्तित्वात आला. तो उघडझाप करणारा हवा. हवा तेव्हा उघडून, नको तेव्हा लोटण्यासाठी त्याची एक बाजू कोरलेल्या चौकटीच्या आत लाकडी चौकट बसवून तिच्या एका बाजूला घट्ट जोडून टाकली जाते. फक्त इतकंच करून चालत नाही, कारण ढकलून कोणीही आत येऊ शकते. म्हणून दाराला आतून कडी लावावी लागते. कडी म्हणजे साधारणपणे गोल किंवा चपटी, साधारण फूटभर लांबीची धातूची पट्टी जमिनीपासून साधारण तीन फुटाच्या आत बाहेर उंचीवर ही पट्टी बोगदा असलेल्या दोन सांध्यांवर स्क्रूच्या साहाय्याने आडवी ठोकली जाते. तिचे भोक असलेले टोक लाकडी चौकटीला घट्ट बसवलेल्या अशाच छोटय़ा बोगद्यात शिरते आणि दार बंद होते. भोकातून जरूर पडल्यास कुलूप अडकविता येते. ही आतली कडी जरा नाजूक आणि लहान असते. तिच्या सोबतीला वरती बेल्ट असतो.

दाराची बाहेरची महत्त्वाची कडी आकाराने मोठी भक्कम असते. कडीला जे हँडल असते त्याला फट असते. कडी पोकळ बोगद्यात घुसून दार बंद झाल्यावर ही फट दाराला टेकविल्यावर त्यातून कोयंडा बाहेर डोकावतो. तिथे कुलूप अडकवले की घर सुरक्षित होते. पूर्वी एकच कोयंडा असायचा. बाहेर जातानाच फक्त कुलूप लावावे लागायचे. पण चोर लोक याचा फायदा घेऊन वेळीअवेळी चोरी करताना आसपासच्या बिऱ्हाडांच्या दारांच्या कडय़ा लावून टाकायचे. त्यांचा हा बेत हाणून पाडण्यासाठी आजकाल कडीला कायम कुलुपात ठेवले जाते आणि तिची हालचाल बंद केली जाते. त्यामुळे चोराची आवाजी बंद होते.

एका दाराने आडोसा मिळाला, स्वातंत्र्य जपलं गेलं, सुरक्षितताही लाभली, पण एक दार उघडमीट करायला अवजड वाटल्यामुळे, त्या दाराचे दोन भाग केले गेले. बंद होताना  हे दोन समान भाग एकमेकांना धरून ठेवत. अशी दोन सारखी दारं वापरायचा परिपाठ चालू झाला. दोन्ही दारांना आतल्या बाजूला वरच्या भागात बोल्ट लावून त्यातले हवे ते बंद आणि हवे ते उघडे ठेवून आत प्रवेश करणाऱ्या सगळ्याच गोष्टीवरती निर्बंध लावता येणे शक्य होऊ लागले.

कडीचं मूळ रूप म्हणजे कडीच्या ऐवजी लंबकासारखा ज्याच्या टोकाला ‘फट’ असणारा लोखंडाचा तुकडा. तो दुसऱ्या दाराच्या अर्धवर्तुळाकृती कडीत अडकवला जायचा. दारं उघडी असताना तो लोंबत राहायचा. दार बंद करताना शेजारच्या दाराची अर्धवर्तुळाकृती कडी त्या फटीतून बरोबर बाहेर यायची. मग त्याच्यात अडकून बसेल अशी घरातली न वापरातली रवी, उलतनं, कालथा घातला की दार मस्त बंद व्हायचं. दार उघडताना आणि बंद करताना थोडी आवाजाची खळखळ व्हायची. सगळ्यांचे कान आणि डोळे दाराकडे लागायचे.

एक काळ असा होता की घराची दारं नेहमी उघडी असायची. चाळ असो, बंगला असो किंवा एका गल्लीपासून मागच्या दुसऱ्या गल्लीपर्यंत आगगाडीच्या डब्यासारखं असणारं घर असो; दारं फक्त रात्री बंद व्हायची. येणारे-जाणारे ओळखीचे सरळ हक्कानं आत घुसायचे. त्यामानाने घरातल्या चोऱ्यांचे प्रमाण कमी असायचे. कधी कधी बाहेरच्या फाटकाचा खास आवाज कोणीतरी आल्याची वर्दी देऊन जायचा. त्यामुळे दार उघडण्याचे कष्ट घ्यावे लागत नसत. ते काम कमी असे. दार सलग एक असो किंवा दोन भागांत असो, घराची सुरक्षा संभाळायला समर्थ असे.

परंतु काळाबरोबर परिस्थिती बदलत जाते, जीवनमान बदलते, असुरक्षितता वाढत जाते. वाडा, चाळ संस्कृती नामशेष होते. बीएचके संस्कृती रुजू लागते. घराला असलेल्या मागच्या आणि पुढच्या दोन दारातलं एक दार हळूच नाहीसं होतं. सगळा भार पुढच्या एकाच दारावर पडतो. कडीकोयंडय़ाबरोबरच अ‍ॅटोमेटिक लॅच दाराला लावले जाते; नाकात वेसण घालावी ना तसे. पूर्वी कोणी आले की येणारी व्यक्ती दाराची कडी वाजवायची. परंतु ब्लॉक सिस्टीम चालू झाल्यापासून दोन कोयंडय़ामुळे कडी कुलुपासकट हालचाल न करता स्तब्ध राहू लागलेली असते. त्यामुळे दाराच्या चौकटीत बेल हजर झाली. वेळीअवेळी बेल वाजली की कोण आलं असेल हे प्रश्नचिन्ह उभं राहतं. बंद दरवाजामुळे नाही म्हटलं तरी बाहेर कोण आहे याचा पत्ता लागत नाही. त्यावर उपाय म्हणून दाराला पिनहोल बसविण्यात येऊ लागले. त्यातून बघितल्यावर दाराबाहेर असलेली व्यक्ती दिसायची. ती बघूनच मग दार उघडले जाऊ लागले. पण लहान मुलांना बेल वाजली की दार उघडायची घाई असते. पिन होलमधून बघण्याइतकी उंचीही नसते. त्यासाठी एक साखळी दाराला अडकवण्यात येते. ती लावून दार उघडलं तर बाहेरची व्यक्ती पटकन् आत येऊ शकत नाही. पण ही गोष्ट कृतीत आणणं फार कठीण, किंबहुना अशक्यच असते, आहे. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जाळीच्या दाराची संकल्पना अस्तित्वात आली.

मुख्य दरवाजाच्या बाहेर आणखीन एक दरवाजा लागला. त्याच्या साधारणपणे अर्ध्या भागात ग्रील किंवा विविध नक्षीची जाळी लावण्यात येऊ लागली. त्यामुळे सुरक्षेमध्ये नक्कीच वाढ झाली. व्यक्तीला बघून दार उघडता येऊ लागलं. फेरीवाले विक्रेते हे एकदम घरांत घुसण्याची शक्यता कमी झाली. ब्लॉक सिस्टीममध्ये दार बंद झालं की बाहेरच्या जगाशी शेजाऱ्यापाजाऱ्यांशी संपर्कच तुटल्यासारखी अवस्था होत असते. अशावेळी ग्रीलचा दरवाजा असल्यामुळे आतला मुख्य दरवाजा उघडा ठेवला तर जरा जाग पण वाटते. वर खाली जाणाऱ्या-येणाऱ्यांची चाहूल लागते. वायुविजन चांगले होते. अर्थात ते प्रत्येक घराच्या अंतरंगावर अवलंबून असते.

ग्रीलचा दरवाजा कधी सलग कधी घडीचा असू शकतो. त्याला आतून कडी, बोल्ट असतातच. परंतु बाहेरच्या बाजूला अ‍ॅटोमॅटिक लॅच असल्यामुळे कडी नसू शकते. नसली तरी चालू शकते. ओढलं की दार बंद होतं. कुलूप लावा, लागलं की नाही ते दोन चार वेळेला ओढून बघा हे श्रम आणि वेळ वाचतो. बाहेरून कुलूप न दिसल्यामुळे घरांत कोणी आहे की नाही याचा अंदाज सरळपणे लावता येत नाही. चोराला समजू नये, हा उद्देशही असतो. अर्थात चोराच्या वाटा चोराला बरोबर माहिती असतात. पण शेजाऱ्यांच्या दारांना बाहेरून कडी लावून चोरी करण्याचा प्रयत्न करता येत नाही, हे मात्र खरे. या लॅच सिस्टीममुळे घरातले लोक बाहेर जाताना दार लावायला किंवा किल्ली असेल तर आल्यावर दार उघडायलाही जावे लागत नाही. तिऱ्हाईत कोणी आलं तरच उठावं लागतं, हा मोठा फायदा. किल्ली घ्यायला विसरलं किंवा वाऱ्याने दार लागलं तर मात्र फजिती होते. कोणाकडे तरी जास्तीची किल्ली ठेवणे आवश्यक असते.

ब्लॉक संस्कृतीचा विचार करता आधीचं मागचं दार हळूच जाळीच्या दाराच्या रूपाने पुढे येऊन बसलं, असंच म्हणावं लागेल. सर्वसाधारणपणे आतलं दार मोठं आणि

बाहेरचं जाळीचं घडीचं असा नियमही झाला. दुधाच्या पिशवीसाठी पिशवी सांभाळायचं काम जाळीचं दार बिनबोभाट करू लागलं. टपाल घेऊन आत ढकलू लागलं. कुरियरवाल्याचीही सोय झाली. आपलं काम चोख बजावत मागून येऊन पुढे मिरवू लागलं. कानामागून येऊन तिखट न होता परिस्थिती विचारात घेऊन ही युती झाली आहे, ती योग्य आहे, फायदेशीर आहे. त्यामुळे ती टिकणारही आहे. अर्थात हे सर्वसाधारण घराविषयीचं चित्र आहे, हेही तितकंच खरं..

suchitrasathe52@gmail.com