टायगर श्रॉफ याच्या आगामी ‘ए फ्लाईंग जाट’ या चित्रपटाचा पहिला लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने आपल्या ट्विटरवरुन हे पोस्टर प्रदर्शित केले. त्याने याची लिंकही ट्विटरवर दिली आहे. रेमो डिसुझा दिग्दर्शित ‘ए फ्लाईंग जाट’ चित्रपटाची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर्सची आहे. चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि प्रोफेशनल रेसलर नाथन जोन्स यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. […]