गीतकार साहिर लुधियानवींच्या दर्दभऱ्या गाण्यांमागची दर्दकहाणी!|गोष्ट पडद्यामागची- ८८ |Sahir Ludhianvi
‘कल और आएंगे नग़्मों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले तुम से बेहतर सुनने वाले’ अशा प्रेमळ पण वास्तववादी ओळी लिहिणारा माणूस म्हणजे साहिर लुधियानवी. ज्याला चित्रपटातील गाण्यांमधील शब्दांवर प्रेम आहे त्याला साहिर लुधियानवी कोण? हे वेगळं सांगायची गरजच नाही. अशा वास्तववादी ओळी लिहिणाऱ्या साहिर लुधियानवी यांच्या मनातील शल्य नेमकं काय होतं? जाणून घेऊयात ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून..