समृद्धी महामार्ग ते अटल सेतू, मेट्रोचे जाळे ते वाढवण बंदर अशा अनेक पायाभूत प्रकल्पांमुळे विकासाच्या वाटेवर वेगाने धावणाऱ्या महाराष्ट्राचा वेध घेणाऱ्या ‘महाराष्ट्राच्या विकासवाटा’ या कॅाफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (७ मार्च) मुंबईत होणार आहे. त्यानिमित्ताने ‘महाराष्ट्र ७५’ याविषयावरील चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पायाभूत क्षेत्रातील प्रगतीचा आढावा तज्ज्ञ मान्यवर घेणार आहेत.