23 January 2018

News Flash

हैदराबाद कसोटी भारताने २०८ धावांनी जिंकली

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय कसोटी संघाने वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील ‘विजयी रथ’ बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातही कायम राखला. हैदराबाद कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशला २०८ धावांनी धूळ चारली. भारतीय संघाने दुसऱया डावात दिलेल्या ४५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया बांगलादेशचा डाव २५० धावांत गुंडाळला. अश्विन आणि जडेजाच्या फिरकीवर बांगलादेशी फलंदाजांची दांडी गुल झाली. दोघांनीही प्रत्येकी चार विकेट्स मिळवल्या. तर इशांत शर्माने दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.

आणखी काही व्हिडिओ