Vaibhav Suryavanshi Youngest Cricketer In IPL To Score A Century: १४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध ज्याने सर्वात वेगवान शतक झळकावलं अशा वैभव सूर्यवंशीचं नाव सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवर प्रचंड ट्रेंडिंग आहे.आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचा (RR) १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने इतिहास घडवला आहे. वैभव सूर्यवंशीने वयाच्या १४व्या वर्षी आयपीएलमध्ये खेळत अवघ्या ३५ चेंडूत दुसरं सर्वात जलद शतक झळकावलं आहे. राजस्थानच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सविरूद्धच्या (Gujrat Titans) सामन्यात वैभवने ही कामगिरी केली आहे. स्वतः क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) असो किंवा रोहित शर्मा (Rohit Sharma) सर्वांनीच वैभववर कौतुकाचा वर्षाव केला आहे. राहुल द्रविडला (Rahul Dravid) सुद्धा कालच्या वैभवच्या खेळीने उड्या मारत नाचायला भाग पाडलं. पण हा असा हरहुन्नरी वैभव आहे कोण? तो आला कुठून? त्याची कहाणी काय? या सगळ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह.