News Flash

भाजपच्या गोटात आणखी एक मित्रपक्ष, जनसुराज्य महायुतीत सहभागी

भाजपच्या मित्रपक्षाच्या गोटात आणखी एका पक्ष सहभागी झाला आहे. कोल्हापूर येथील माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष महायुतीत सामील झाला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने जनसुराज्य पक्ष महायुतीत सहभागी झाल्याचे बोलले जाते. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांत होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत विनय कोरे यांचा जनसुराज्यशक्ती पक्ष भाजपाशी आघाडी करणार आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X