भरधाव वेगात असलेल्या ‘ऑडी’ कारने भर रस्त्यात अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी सायंकाळी पिंपरीत घडली. काही मिनिटांतच ही महागडी कार जळून खाक झाली. सुदैवाने कारचा मालक वेळीच कारमधून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. शॉर्टसर्किटमुळे कारने पेट घेतला असल्याची शक्यता अग्निशमन दलाने वर्तवली आहे.