उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी गावात मंगेश निपाणीकर या कलावंताने शेती पिकाच्या माध्यमातून साडे चार एकरात शरद पवारांची अवाढव्य प्रतिमा साकारली आहे. शरद पवार यांच्यासाठी एका शेतकऱ्याने दिलेलं हे बर्थडे गिफ्ट म्हणायला हरकत नाही. यासाठी 600 किलो बियाणे वापरण्यात आले आणि 15 दिवस यासाठी मेहनत घेण्यात आली.