मागील काही वर्षांपासून कॅन्सर या जीवघेण्या आजाराच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हा आजार आपल्याला झाल्याचे समजताच, व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचून जातो. केमोथेरपीचे उपचार घेताना त्या रुग्णांच्या डोक्यावरील केस जातात. हे अनेक रूग्णांना अत्यंत त्रासदायक वाटते. अशाच रुग्णांसाठी पुणे शहरात शिक्षण घेणारी व मुळची वर्धा येथील असलेली १४ वर्षीय ऋत्विजा मून या मुलीने स्वतःचे केस दान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.