जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलनावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ‘जामिया’त घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. दोन महिन्यांनंतर जामियात पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. जामिया समन्वय समितीनं (JCC) हा व्हिडीओ जारी केला आहे.