वर्ध्यातील न्यू इंग्लिश शाळेच्या निवारागृहात वाटेत अडकलेल्या मध्यप्रदेशच्या काही महिला मजुरांना थांबविण्यात आले होते. तसेच इतरही ९० मजूर होते. त्या सर्वांच्या दोन्ही वेळचं जेवण व चहा नाश्त्याची व्यवस्था राज्य शिक्षक परिषदेतर्फे करण्यात आली होती. त्यांचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने टप्याटप्याने त्यांना त्यांच्या प्रांतात सोडले जात आहे. आज दहा महिलांची निरोपाची वेळ होती. निवारा गृहात पाच आठवडे सांभाळल्यानंतर या महिलांना साडीचोळी देवून शिक्षकांनी निरोप दिल्यावर महिलांना अश्रू अनावर झाले.