उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबेला पोलिसांनी चकमकीत ठार केलं आहे. विकास दुबे याने गेल्या कित्येक वर्षांपासून आपली दहशत कायम ठेवली होती. त्या काळात विकास दुबेनं गुन्हेगारी जगतात जम बसवत चांगलाच पैसा कमावला असल्याचं त्याचे गावकरी सांगतात. हा विकास दुबे नेमका कोण होता ? जाणून घेऊयात.