पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांच्या टोळक्याने सुमारे २४ वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन जणांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या टोळक्यानं मध्यरात्री मद्यप्राशन करून लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड केली आहे. दरम्यान, दोन किलोमीटरच्या परिसरात ही तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली.