मुंबईत दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळपासून पावसाने हजेरी लावली असली तरी गोविंदा पथकांचा उत्साह देखील कायम आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ठाण्याच्या टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवासाठी पोहोचले. यावेळी अभिनेत्री रकुलप्रित सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत करत उपस्थित गोविंदा पथकांनाही
शुभेच्छा दिल्या.