Sanjay Raut on Ajit Pawar: संजय राऊतांचा अजित पवारांना सवाल, नेमकं काय म्हणाले…?
लोकांच्या कामाचा दबाव होता म्हणून महायुतीत गेलो, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरातील सभेत केलं होतं. त्यावरून आता खासदार संजय राऊत यांनी त्यांना उलट प्रश्न केला आहे. जालन्यातील आंदोलन संपवणं हे तुमचं काम नाही का? तुमच्यावर कोणत्या कामासाठी दबाव होता? जालन्यातील आंदोलन ईडी, सीबीआय संपवणार नाहीत, असा टोलाही त्यांनी अजित पवारांना
लगावला आहे.