Aditya Thackeray: आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा
आमदार अपात्रतेची सुनावणी दोन आठवडे लांबणीवर
गेली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना खडेबोल सुनावले. त्यामुळे अपात्रतेच्या प्रकरणावरून आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान,
मध्यप्रदेश येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं
अनावरण होणार आहे. त्यानिमित्ताने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे मध्यप्रदेश दौऱ्यावर असणार आहेत. त्याआधी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.