Aseembly Election Results2023: भाजपाच्या विजयावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं आहे. मुंबईतही भाजपच्या कार्यालयाबाहेर वियजयाचा जल्लोष केला जात आहे. आजच्या निकालांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही भाष्य केलं. या विजयाचं श्रेय त्यांनी भाजपाच्या संपूर्ण टीमला दिलं आहे. तसंच भाजपाची मतं दहा टक्क्यांपेक्षाही जास्त वाढलेली असल्याचा दावा यावेळी फडणवीसांनी केला.