Farmer on onion issue: कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा, व्हिडीओ व्हायरल
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने शेतकरी पुरताच हवालदिल झाला आहे. राज्यातील शेतकऱ्याने आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरलं आहे. अशाच एका कांदा उत्पादकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या शेतकऱ्याने चक्क ६४ पोती कांदा फुकट देण्याचं जाहीर करत सरकारच्या भूमिकेवर आपला रोष व्यक्त केला आहे