मावळ लोकसभेत अजित पावरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत महायुतीतील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. मतदान काही तासांवर येऊन ठेपलं असताना भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगलेला दिसून आला. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी दिवसा धनुष्यबाण आणि रात्री मशाल चालवणाऱ्यांची निकालानंतर पोलखोल करणार असल्याचा इशारा दिला. तर भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी सुरुंग विरोधकांना लावायचा आहे, महायुतीला नाही ना? असा प्रतिप्रश्न शेळकेंना विचारला. तर उद्योगमंत्री उदय सामंत आणि उमेदवार श्रीरंग बारणेंनी महायुतीनं एकदिलाने काम केलं तर विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल. असं म्हणत भाजप – राष्ट्रवादीसह घटक पक्षांना साकडं घातलं. अजित पवारांनी हाच धागा धरला अन गडबड करणाऱ्यांची खैर नाही. असा सज्जड दम खालच्या कार्यकर्त्यांना भरावा लागला. अजित पवारांच्या सभेत महायुतीतील खदखद चव्हाट्यावर आली.