पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेकडून करण्यात येणारी टीका यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिला. भाजप हा लाचारांचा पक्ष नाही, त्यामुळे भविष्यात शिवसेनेकडून मान मिळाला नाही तरी चालेल. मात्र, अपमान सहन करून घेतला जाणार नाही, असे नितीन गडकरींनी ठणकावून सांगितले.   नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून, जागतिक पातळीवरही त्यांचा सन्मान केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांत शिवसेनेकडून त्यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली जात आहे. ही गोष्ट भाजपच्या कार्यकर्त्यांना आजिबात आवडली नसल्याचे त्यांनी सांगितले.