महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदी सरकारने दीपक लाड यांची नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी लाड यांना शपथ दिली. यावेळी वीज आयोगाच्या अध्यक्ष चंद्रा अय्यंगार, सदस्य अझीझ खान, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अजय मेहता उपस्थित होते. लाड हे ‘महावितरण’मधून ३६ वर्षांच्या सेवेनंतर मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी काही वर्षे खासगी वीजकंपन्यांचे सल्लागार म्हणून काम पाहिले.