जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांसाठी गुजरातमधून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे या निवडणुका सुयोग्य प्रकारे पार पडतील का, अशी शंका व्यक्त केली जात असून, त्यामुळे अनावश्यक वाद निर्माण झाला असल्याचा आरोप सत्तारूढ नॅशनल कॉन्फरन्सने केला आहे.
गुजरातमधूनच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्याचा निर्णय का घेतला आहे, असा सवाल नॅशनल कॉन्फरन्सचे प्रांतिक अध्यक्ष नसीर अस्लम वनी यांनी उपस्थित केला़
जम्मू आणि काश्मीरमधील निवडणुकीत ‘मिशन ४४ अधिक’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच भाजपशासित राज्यातून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून दिली जात आहेत, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे, असेही वनी म्हणाले. ही मतदान यंत्रे सुयोग्य असतील तरीही भाजपच्या उद्दिष्टामुळे त्याबाबत शंका उपस्थित केली जाणार आहे, असेही ते म्हणाल़े