प्रत्यक्ष मतदानाला तरुण बाहेर पडले असतील किंवा नसतील, पण सोशल नेटवर्किंग साइट्सवर मतदानाचा उत्साह दिसत होता. मतदान केंद्रांवर काढलेले सेल्फी, शाई लावलेल्या बोटाचे फोटो सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून शेअर केले जात होते. त्याचवेळी नवे विनोदही पसरवले जात होते. ‘मतदान केंद्रावर नाव विचारतील.. तेव्हा खरं नावं सांगा, नाहीतर सांगाल.. माझं नाव शिवसेना,’ दोन मुली मतदानासाठी जातात.. केंद्रावरीच गर्दी पाहून एक मैत्रीण दुसरीला सांगते. फारच गर्दी आहे, आपण उद्या येऊ. गुगल स्लो झालय.’ आयटीमध्ये काम करणारे लोक. ऑनलाइन मतदानाची साइट शोधतायत’, मतदानाच्या दिवशी पर्यटनाला जाऊ नका.. ट्रॅफिक जॅममध्ये अडकाल.. त्यापेक्षा पुढील करमणुकीसाठीची तरतूद म्हणून तरी मतदान करा.’ यांसारखे विनोद दिवसभर फिरत होते. ‘उगाच शाई लावलेल्या बोटांचे फोटो टाकून आमचा नेट पॅक फुकट घालवू नये. मतदान करणे ही तुमची जबाबदारी आहे. आमच्यावर उपकार नाहीत, हे लक्षात घेणे – हुकमावरून’ ‘बोटाला लावलेली शाई घरच्या दौतीतील नाही याचा पुरावा म्हणून मतदान यंत्रावर बटण दाबतानाचा स्वत:चा फोटो टाकावा.’ विनोद आणि सेल्फीजनी कुणाचे काय साधले यापेक्षाही निवडणुकीचे वातावरण नक्कीच तयार केले.