राज्यपालांना धक्काबुक्की केली नाही

राज्यपालांना आम्ही धक्काबुक्की केलीच नसून ती भाजपच्याच आमदारांनी केल्याचा दावा निलंबित आमदारांनी केला आहे.

राज्यपालांना आम्ही धक्काबुक्की केलीच नसून ती भाजपच्याच आमदारांनी केल्याचा दावा निलंबित आमदारांनी केला आहे. राज्यपालांच्या प्रतिमेला धक्का लागेल, असे कोणतेही कृत्य आम्ही केलेले नाही. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी या आमदारांनी केली आहे.
भाजपचे आमदार राज्यपालांचे अंगरक्षक असल्याप्रमाणे वागत होते व त्यांनीच धक्काबुक्की केली. जणू आम्हाला फसविण्यासाठी त्याच आमदारांची साक्ष नोंदवून बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई करण्यात आली. प्रसंगाचे व्हिडीओचित्रीकरण पाहून सत्यता तपासावी. चौकशी समितीपुढे आम्ही निर्दोषत्व सिध्द करु, असा विश्वास या आमदारांनी व्यक्त केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress deny heckling governor

ताज्या बातम्या