देवेंद्र फडणवीस सरकारच्या उद्या होणाऱ्या शाही शपथविधी समारंभावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. जनतेकडून कराच्या रुपाने जमा होणाऱ्या पैशांचा असा दुरुपयोग करणे चुकीचे आहे, अशी टीकाही केली आहे.
वानखेडे स्टेडियमवर कोटय़वधी रुपये खर्च करून एवढा शाही शपथविधी करण्याची गरजच काय, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला पंतप्रधानानांनी उपस्थित राहण्याची परंपरा नाही. पण नरेंद्र मोदी यांनी ती पाडली आहे. केंद्र आणि राज्यात काँग्रेसचे सरकार असताना हे सरकार उधळपट्टी करते, असा आरोप भाजपचे नेते करीत. आता शपथविधीसाठी एवढा खर्च करणे ही उधळपट्टी नाही का, असा सवालही गाडगीळ यांनी केला. हरयाणामध्ये झालेल्या भाजप सरकारच्या शपथविधीला माजी मुख्यमंत्री हुड्डा हे उपस्थित राहिले नव्हते. पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यास उपस्थित राहू नये, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही समारंभाला जाण्याचे टाळावे, अशी पक्षाच्या नेत्यांची भूमिका आहे. स्वत: चव्हाण मात्र उपस्थित राहण्याबाबत अनुकूल असल्याचे समजते.
या शाही शपथविधी समारंभावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. जनतेकडून कराच्या रुपाने जमा होणाऱ्या पैशांचा असा दुरुपयोग गैर आहे, अशी टीकाही पक्षाने केली आहे. कोटय़वधी रुपये खर्चून शाही शपथविधी करण्याची गरजच काय, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी केला. पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यास उपस्थित राहू नये, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मात्र उपस्थित राहण्याबाबत अनुकूल असल्याचे समजते. भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे हे तिघे हजर राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2014 रोजी प्रकाशित
काँग्रेसची शाही शपथेवर टीका
देवेंद्र फडणवीस सरकारच्या उद्या होणाऱ्या शाही शपथविधी समारंभावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. जनतेकडून कराच्या रुपाने जमा होणाऱ्या पैशांचा असा दुरुपयोग करणे चुकीचे आहे, अशी टीकाही केली आहे.

First published on: 31-10-2014 at 02:30 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress question on devendra fadnavis royal oath ceremony celebration