विविध राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांनंतर प्रसारमाध्यमे आणि विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला चांगलेच धारेवर आहे. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मोदींना उद्देशून ‘फेकू’ हे बिरूद लावण्यात आले होते, त्याचाच संदर्भ घेत ट्विटरकर गेले दोन दिवस ’वर्ल्ड फेकू डे’ (#WorldFekuDay) साजरा करत आहेत. बुधवारी दिवसभर #HappyBirthDayPM नंतर #WorldFekuDay हा हॅश टॅग इंडिया ट्रेंिडग लिस्टमध्य़े दुस-या स्थानवर ट्रेंड करत होता. तसेच पहिल्या पाचमध्ये #bypollresults,#ModiFailsTest,#IncredibleASUS हे निवडणुकीशी संबंधीतहॅश ट्रेंड करीत होते.
मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ’हॅप्पी बर्थडे फेकू मोदी’, असं काहींनी म्हटलं आहे. तर मोदी हे पंतप्रधान असताना मी त्यांचा वाढदिवस ‘फेकू मोदी’ असा साजरा केला होता, आता ते पंतप्रधान आहेत त्यामुळे आम्ही त्यांचा वाढदिवस ‘वर्ल्ड फेकू डे’ म्हणून साजरा करत आहोत, असं एकाने म्हटलं आहे. एका व्यक्तीने तर चक्क म्हटलंय की, १०० दिवसांचा हनिमून आता संपला आहे, त्यामुळे आता पंतप्रधानांनी कामाला लागलेलं बरं. दरम्यान, अमेरीकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधानांना ‘वर्ल्ड फेकू डे’ दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याचं ट्विटही करण्यात आलं आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2014 रोजी प्रकाशित
‘फेकू’ ते ‘वर्ल्ड फेकू डे’
विविध राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांनंतर प्रसारमाध्यमे आणि विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला चांगलेच धारेवर आहे.

First published on: 18-09-2014 at 02:52 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Feku to world feku day on social media