आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढविण्यावर मनसेचा भर असून मराठवाडय़ातील उमेदवार निश्चित करण्यासाठी राज ठाकरे रविवारी औरंगाबाद येथे रवाना झाले. मराठवाडय़ात मनसेकडे मोठय़ाप्रमाणात कार्यकर्ते तसेच इच्छुकही असल्यामुळे या इच्छुकांच्या चाचपणीचे काम राज स्वत: करणार आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे व नशिक पाठोपाठ मराठवाडय़ात मनसेला विधानसभेत चांगल्या जागा मिळतील असा विश्वास मनसेचे गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला. गेल्या महिन्यात सरचिटणीस तसेच संपर्क प्रमुखांची बैठक राज यांच्या निवासस्थानी झाली होती. यावेळी उमेदवार निश्चितीचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि मराठवाडय़ात मनसेमध्ये अनेक इच्छुक असून राज यांनीच उमेदवार निश्चित करावे असे बैठकीत ठरल्यामुळे राज ठाकरे औरंगाबाद येथे रवाना झाले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Mns focuses on marathwada
First published on: 15-09-2014 at 02:45 IST