गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात ताडपल्ली मतदान केंद्रावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनीही नक्षलींच्या गोळीबारीला जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलीसांच्या तात्काळ प्रत्युत्तरानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. सुदैवाने ताडपल्ली येथील नक्षलींच्या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. तर, चार्मोशीतील म्हस्केपल्ली येथे मतदान केंद्रावरून परतत असताना नक्षलवाद्यांनी निवडणूक अधिकाऱयांच्या वाहनांवर हल्ला केला. उपस्थित पोलिसांनीही ताबडतोब नक्षलींच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे.
राज्यातील दुर्गम भाग म्हणून गडचिरोलीत दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. नक्षलग्रस्त विभाग असूनसुद्धा संपूर्ण जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले परंतु, मतदानाची वेळ संपल्यानंतर या दोन घटना घडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxals attack polling booth at gadchiroli
First published on: 15-10-2014 at 05:21 IST