खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्य़ासह तब्बल ११ गुन्हे दाखल झालेल्या उमेदवाराच्या प्रचारास आज खुद्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी उपस्थिती लावली.  
खानापूर मतदार संघातील भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह विटा येथे आले होते. पडळकर यांच्याविरुद्ध आटपाडीसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यासह तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत. भाजपने त्यांना दिलेली उमेदवारी अगोदरच चर्चेत असताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली. दोन महिन्यापूर्वी पडळकर यांची १ महिन्यानंतर जामिनावर मुक्तता झाल्यावर कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली होती. हे सर्व गुन्हे राजकीय कारणावरून दाखल झाले असल्याचे पडळकर सांगत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh campaign for criminal background gopichand padalkar
First published on: 10-10-2014 at 03:28 IST