शिवसेना-भाजपमधील जागावाटपाबाबत सकारात्मक बोलणी सुरु असून आठ-दहा दिवसांत मार्ग निघेल, असे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी पत्रकारांना सांगितले. बिहार आणि कर्नाटकमधील पोटनिवडणुकीच्या निकालांचा महाराष्ट्रात कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी ओम प्रकाश माथूर यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पण त्यांच्यावर निवडणुकीपुरतीच जबाबदारी असून पक्षाची नियमित जबाबदारी रुडी यांच्याकडेच राहणार आहे. युतीमध्ये जागावाटपाचा तिढा आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ तून टीका केली जाते, याविषयी विचारता आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. शिवसेना हा जुना मित्रपक्ष
आहे, असे रुडी यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2014 रोजी प्रकाशित
‘युतीच्या जागावाटपाबाबत दहा दिवसांत तोडगा’
शिवसेना-भाजपमधील जागावाटपाबाबत सकारात्मक बोलणी सुरु असून आठ-दहा दिवसांत मार्ग निघेल, असे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी पत्रकारांना सांगितले.

First published on: 27-08-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena bjp to solve seat distribution issue in 10 days