व्हिडिओ: ‘कम्युनिकेशन गॅप’मुळे भाजपच्या जागा कमी होऊ शकतात- मेटे

निवडणूक लढविताना जेवढे कम्युनिकेशन असायला हवे, तेवढे मला भाजपमध्ये दिसत नाही. त्याचा फटका निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो, अशी शक्यता भाजप महायुतीतील घटक पक्ष शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केली.

निवडणूक लढविताना जेवढे कम्युनिकेशन असायला हवे, तेवढे मला भाजपमध्ये दिसत नाही. त्याचा फटका निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो, अशी शक्यता भाजप महायुतीतील घटक पक्ष शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केली. मेटे बीड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपतील विसंवादावर बोट ठेवले. भाजपमध्ये तिकीट देताना गटातटाचा वाद झालेला मला दिसला, असे सांगून मेटे यांनी कम्युनिकेशन गॅपमुळे पक्षाच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तविली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: There is a communication gap in bjp vinayak mete

ताज्या बातम्या