कर्नाटकमधील वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित करण्याच्या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या १८ खासदारांसह ठाकरे पंतप्रधानांना भेटतील. कर्नाटक पोलिसांनी मराठी बांधवांवर केलेल्या अत्याचारांबाबत सीमाभागातील नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी सुनावणीही होणार आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सीमा भागातील नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी दिली.