पुण्याजवळील वाघोली येथे ‘भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट’ आयुर्वेद संशोधन प्रकल्पांतर्गत कॅन्सर रुग्णांवर उपचार व संशोधनाचे काम सुरू आहे. गेल्या दोन दशकांत प्रकल्पातर्फे ८७३७ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरवर या प्रकल्पात उपचार करण्यात येत असून ‘कॅन्सर बरा करतो’ असा कोणताही दावा प्रकल्पातर्फे केला जात नाही. तथापि, प्रकल्पातील संशोधनात रुग्णाचे जीवनमान सुधारत असल्याचे तसेच रेडिएशन व केमोथेरपीनंतर होणारा त्रास निश्चितपणे कमी होत असल्याचे दिसून येते.

मृ त्यू जेव्हा चोरपावलांनी येतो तेव्हा निदान मन सावरता येते.. एक अटळ वास्तव म्हणून त्याचा स्वीकार करता येतो. पण तोच मृत्यू जेव्हा थंड पावलांनी मन आणि शरीर पोरखत आपले पाश घट्ट करत मरणालाच जागवू पाहतो तेव्हाची तगमग शब्दातीत असते. कॅन्सर रुग्णांची आणि त्यांच्या आप्तांची स्थिती नेमकी अशीच असते. दारात यमदूत उभा असतो आणि सुरू होते एक निकराची झुंज.. कॅन्सर हा आजार आजही आपला दबदबा ठेवून आहे. कॅन्सर झाला, हा शब्द कानी पडताच सामान्यत: रुग्णाची जी अवस्था होते ती वर्णन करण्यापलीकडे आहे. कारण एकच, आजही या आजारावर ठोस उपाय सापडलेला नाही. आधुनिक वैद्यकशास्त्रात यावर प्रचंड संशोधन सुरू आहे. आधुनिक वैद्यकाच्या जोडीला आयुर्वेदातही यावर मोठे संशोधन सुरू असून अ‍ॅलोपथीतील रेडिएशन व केमोथेरपीनंतर रुग्णाला होणारा त्रास सुसह्य़ करण्यात आयुर्वेदाला बऱ्यापैकी यश आले आहे.
गेल्या दोन तपांहून अधिक काळ पुण्याजवळील वाघोली येथे ‘भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट’ आयुर्वेद संशोधन प्रकल्पांतर्गत कॅन्सर रुग्णांवर उपचार व संशोधनाचे काम सुरू आहे. आयुर्वेदात प्रथम पीएच.डी. पदवी संपादन केलेले वैद्य सदानंद सरदेशमुख व त्यांचे वडील प्रभाकर महाराज सरदेशमुख यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या या बीजरूपी प्रकल्पाचे आता वृक्षात रूपांतर झाले आहे. आयुर्वेदाला अ‍ॅलोपथीच्या कसोटय़ा वापरून संशोधन तपासले तर जातेच, शिवाय यातून निघालेले निष्कर्ष जागतिक पातळीवरील वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्धही करण्यात आले आहेत. अमेरिकेत कॅन्सरवर पीएच.डी. केलेले व मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडिएशन विभागाचे प्रमुख असलेले ख्यातनाम कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अरविंद कुलकर्णी हेही या प्रकल्पाचे आधारस्तंभ आहेत. डॉ. कुलकर्णी यांनी आधुनिक वैद्यकाच्या मदतीने सुमारे ३५ हजारांहून अधिक कॅन्सर रुग्णांवर उपचार केले आहेत. आज ते तसेच आधुनिक वैद्यकातील डॉ. शिरीष कुमठेकर, डॉ. सुधा गांगल, डॉ. अनिल संगानेरिया, डॉ. श्रीकांत अंकोलीकर, डॉ. तुषार पाटील, डॉ. सुमीत बसू, डॉ. दीपक लड्डा आदी अनेक नामवंत डॉक्टर वैद्य सरदेशमुख यांच्या कॅन्सर प्रकल्पात काम करत आहेत. शास्त्रशुद्ध पायावर आधारित आयुर्वेदिक उपचार करताना अ‍ॅलोपथी उपचाराची गरज लक्षात घेऊन २०१० मध्ये वाघोलीमध्ये ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट’ सुरू करण्यात आली. या अंतर्गत रुग्णाला आयुर्वेदिक उपचाराबरोबरच एकाच ठिकाणी रेडिएशन, केमोथेरपी तसेच शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कॅन्सर प्रकल्पात आयुर्वेदाचा भाग हा वैद्य सरदेशमुख यांच्याबरोबर डॉ. विनिता देशमुख, डॉ. वासंती गोडसे, डॉ. श्रीनिवास दातार, डॉ. श्वेता गुजर, डॉ. स्वप्ना कुलकर्णी, डॉ. प्रशांत सुरू तसेच डॉ. भाग्यश्री सरदेशमुख, डॉ. सुश्रुत व सुकुमार सरदेशमुख आदी डॉक्टर पाहतात. वाघोलीतील संस्थेच्या ७३ एकर जागेवर यासाठी १२० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आहे. तसेच संस्थेच्याच फार्मसीमध्ये औषधे तयार केली जातात. याची सारी जबाबदारी डॉ. सुकुमार यांच्याकडे असून वनौषधी प्रकल्प, गोपालन संस्थेच्या आवारातच करण्यात येते. खरे तर या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्याला कारणीभूत ठरले ते विधान परिषदेचे तत्कालीन सभापती बाळासाहेब भारदे. भारदे यांच्या एका नातेवाईकाला कॅन्सर झाला होता व तो अखेरच्या टप्प्यात असल्याचे टाटा कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे होते. त्यामुळे बाळासाहेब भारदे यांनीच आपल्या या नातेवाईकावर उपचार करण्याची डॉ. सदानंद सरदेशमुख यांना विनंती केली. साठीच्या या महिलेला मुलाचे लग्न पाहण्याची इच्छा होती. डॉक्टरांच्या आयुर्वेदिक उपचारानंतर नातवंडांबरोबर काही काळही त्यांनी काढला. त्यानंतर भारदे यांनी अनेक रुग्ण डॉ. सरदेशमुख यांच्याकडे पाठवले. यातूनच कॅन्सरवर आयुर्वेदाच्या माध्यमातून संशोधन करण्याचा निर्णय घेण्यात येऊन १९९४ मध्ये कॅन्सर संशोधन प्रकल्प आकाराला आहे.
गेल्या दोन दशकांच्या वाटचालीत ८७३७ कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यात आले असून यात ६० हून अधिक रुग्ण हे जर्मनी, जपान अमेरिका तसेच ऑस्ट्रेलियातील आहेत. डॉ. सरदेशमुख यांच्या कार्याची दखल जपान, जर्मनी व ऑस्ट्रेलियात मोठय़ा प्रमाणात घेतली गेली. कॅन्सरव्यतिरिक्त अन्य आजारांसाठीही परदेशातून त्यांच्याकडे मोठय़ा संख्येने रुग्णांचा ओघ असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरवर या प्रकल्पात उपचार करण्यात येत असून कॅन्सर बरा करतो असा कोणताही दावा आम्ही करत नाही, असे डॉ. सरदेशमुख यांनी स्पष्ट केले. तथापि, आमच्या संशोधनात रुग्णाचे जीवनमान सुधारत असल्याचे तसेच रेडिएशन व केमोथेरपीनंतर होणारा त्रास निश्चितपणे कमी होत असल्याचे दिसून येते असे त्यांचे म्हणणे आहे. आयुर्वेद तसेच अन्य उपचारपद्धतींमध्ये कॅन्सरवर होणारे संशोधन एका व्यासपीठावर यावे यासाठी भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या माध्यमातून चार आंतरराष्ट्रीय कॅन्सर परिषदांचे आयोजन करण्यात आले. या परिषदांना जगभरातून डॉक्टरांची उपस्थिती तर होतीच शिवाय भारतातील अ‍ॅलोपथीमधील डॉ. ग्रँट यांच्यासह अनेक दिग्गज डॉक्टरांनीही उपस्थिती लावली होती.
या प्रकल्पात रुग्ण चार टप्प्यांत दाखल करून घेतला जातो. ज्यांना कॅन्सर झाला आहे व केवळ आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत, ज्यांना अ‍ॅलोपथी व आयुर्वेदिक असे दोन्ही उपचार घ्यायचे आहेत, ज्यांचे अ‍ॅलोपथीचे उपचार संपले आहेत आणि ज्यांचा कॅन्सर बरा झाला आहे तथापि प्रिव्हेंटिव्ह म्हणून आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत, अशा रुग्णांची व त्यांच्यावरील उपचाराची सविस्तर नोंद ठेवण्यात येते तसेच त्याचा अ‍ॅलोपथीच्या कसोटय़ांचा वापर करून तौलनिक अभ्यासही केला जातो. ट्रस्टच्या कॅन्सर संशोधन प्रकल्पाच्या कामाची दखल घेऊन भाभा अणुसंशोधन केंद्राने अडीच कोटींचे कोबाल्ट मशीन संस्थेला दिले तर ‘आयुष’ने रेडिएशन सेंटरच्या उभारणीसाठी तीन कोटींचा निधी दिला. डॉक्टर सरदेशमुख यांच्या कामाची दखल विख्यात उद्योगपती रतन टाटा यांनीही घेतली. टाटांनी पुणे व मुंबईतील प्रकल्पाला भेट घेऊन सविस्तर माहिती तर घेतलीच शिवाय या कामाचे कौतुक करून कॅन्सर रुग्णांच्या पंचकर्म रुग्णालयासाठी दहा कोटी रुपयांची देणगी दिली. ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख, डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह देश-विदेशातील अनेक मान्यवरांची या आयुर्वेद संशोधन प्रकल्पाची माहिती घेतली तसेच भेटही दिली आहे. २९ मे २०१० रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी वाघोली येथे ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च प्रकल्पाचे उद्घाटन केले. या वेळी राष्ट्रपतींनी आठ रुग्णांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्यातील आत्मविश्वास पाहून त्या थक्क झाल्या. रक्ताचा कर्करोग झालेला एक तरुण केवळ आयुर्वेदिक उपचार घेत असून त्याने लग्नही केले व त्याला आता सहा महिन्यांची मुलगी असल्याचे त्याने राष्ट्रपतींना सांगितले तेव्हा त्यांना आपले आश्चर्य लपवता आले नाही. त्यानंतर केलेल्या भाषणात प्रतिभा पाटील म्हणाल्या, ‘ येथे एकाही रुग्णामध्ये कॅन्सरच्या भीतीचे भाव मला दिसले नाहीत. गेली वीस वर्षे कोणताही गाजावाजा न करता वैद्य सरदेशमुख यांचे काम सुरू आहे. खरे तर या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता तुम्ही गाजावाजा केला पाहिजे.’
या इंटिग्रेटेड कॅन्सर संशोधन प्रकल्पाच्या विस्ताराची १५० कोटी रुपयांची योजना हाती घेतली आहे. यातील आयुर्वेद विभागात शमन चिकित्सा, पंचकर्म, वनौषधी विकास, योग विभाग, समुपदेशन आणि अ‍ॅलोपॅथीअंतर्गत रेडिओथरपी, केमोथेरपी, आँकोपॅथॉलॉजी, जेनेटिक प्रयोगशाळा अशा अनेक गोष्टींचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी दानशूर लोकांनी तसेच सीएसआरअंतर्गत कंपन्यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन संस्थेने केले असून आयुर्वेदात कॅन्सरवर सुरू असलेल्या या संशोधन कार्यात तुमचा-आमचाही खारीचा वाटा असला पाहिजे.
ल्ल संदीप आचार्य

पुणे स्टेशनपासून २० किमी अंतरावर, पुणे-नगर रस्त्यावर वाघोली गाव आहे. वाघोली गावात केसनंद फाटय़ावर आत वळल्यावर दोन किमी अंतरावर भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरची वास्तू उभी आहे.

भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट, वाघोली (जि. पुणे)
पुण्याप्रमाणेच मुंबईत दादर, सोलापूर, नाशिक, दिल्ली आदी ठिकाणी कॅन्सर संशोधन व उपचार करण्यात येत असून ट्रस्टच्या वेबसाइटवर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे. संस्थेतर्फे आयुर्वेद महाविद्यालयही गेली अनेक वर्षे सुरू असून कॅन्सरव्यतिरिक्त स्त्री-स्वास्थ्य, संधिवात, एड्स, पंचकर्म आदी प्रकल्पही चालविण्यात येत आहेत.

संस्थेपर्यंत कसे जाल?
रुग्णांना सढळ हस्ते मदत
कॅन्सरवरील उपचारासाठी बहुतेक वेळा येणारे रुग्ण हे अखेरच्या टप्प्यातील असतात. प्रकृती आणि पैशांअभावी त्रस्त असलेल्या शेकडो गोरगरीब रुग्णांना अनेकदा मोफत उपचार करण्यात येतात. आजपर्यंत सुमारे पाच कोटी रुपयांहून अधिक मदत संस्थेच्या माध्यमातून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना करण्यात आली आहे.

धनादेश या नावाने काढावेत
भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट
(Bhartiya Sanskriti Darshan Trust)
(संस्थेच्या देणगीदारांना ८० जी, ३५ (१) (२) व एफसीआरए अंतर्गत आयकरात १०० टक्के व १७५ टक्के सवलत आहे) संस्थांकडे धनादेश नोव्हेंबर महिन्यात सुपूर्द केले जातील.

धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, (०२२-६७४४०५३६)

महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट
नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१० (०२२-२७६३९९००)

ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. (०२२-२५३९९६०७)

पुणे कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे
रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४१०००

नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. (०२५३-२३१०४४४)

नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, (०७१२ – २७०६९२३)

औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग,
१०३, गोमटेश मार्केट, औषधी भवनजवळ, नवा गुलमंडी रस्ता, औरंगाबाद. (०२४०-२३४८३०३)

नगर कार्यालय
संपादकीय विभाग,
१६६, अंबर प्लाझा, पहिला मजला, स्टेशन रोड, अहमदनगर. (०२४१-२४५१५४४/२४५१९०७)

दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१ / बी,
सेक्टर- १० नोएडा (गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश) – २०१३०१
(०१२०- ६६५१५००)

dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार

Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?

Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे