संपादकीय

बाकी कोणत्याही कारणापेक्षा यंदाचं वर्ष लक्षात राहील ते निसर्गानं केलेल्या आपल्या शहरांच्या वाताहतीसाठी. मुंबई, पुणे, चेन्नई, दिल्ली, पाटणा.. अशी अनेक शहरं या वर्षी निसर्गानं घायाळ केली. अगदी केविलवाणी झाली ही शहरं. रयाच गेली त्यांची.

Health insurance for all ages
आता कोणत्याही वयात आरोग्य विमा सुरक्षा खरेदी करता येणार, नेमका बदल काय?
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…

पण हे होणारच होतं. आज की उद्या, हाच काय तो प्रश्न होता. कारण आपण राहतो शहरांत आणि गोडवे गात बसतो खेडय़ांचे. खेडय़ातल्या जगण्याविषयी उगीचच हळवेपणा भरून राहिलाय आपल्याकडे. म्हणजे ते ‘खेडय़ामधले घर कौलारू..’ वगरे वगरे. जगायचं शहरात आणि टिपं गाळायची खेडय़ातल्या जगण्याच्या नावानं. हा आपल्या जगण्यातला बदफैलीपणा. धड एकाशीही प्रामाणिक नाही आपण.

परिणाम..?

बकाल खेडी आणि उसवत चाललेली शहरं. देश नुसता भरलाय अशा गावा-शहरांनी.

आपण विसरलोय या ग्रहावरच्या रहिवाशांना ‘नागरिक’ म्हणतात, ‘खेडूत’ नाही. आपण ‘सिटिझन’ असतो. नगराचे रहिवासी म्हणून नागरिक. सिटिझन. याचा अर्थ असा की, आपण प्रामाणिकपणे शहरं वसवायला हवीत. त्यासाठी काही धोरण हवं, विचार हवा. अशा काही विचाराशिवाय वाढतात ते उकिरडे.. म्हणजे आपली शहरं. आपली शहरं ही अशी असतात, त्यामुळे तिथे राहणारे नाइलाजानं राहतात. आनंद नसतो अनेकांच्या शहरातल्या जगण्यात. जगायचं इथे केवळ पर्याय नाही म्हणून. हृदयात वेदना घेऊन. शहरं सुधारत नाहीत. उसवत जातात असह्य़ वेदनेत.

शहरं उभारणीचा शास्त्रशुद्ध विचार नाही आणि त्यामुळे ती उभारण्यासाठी पडेल ते कष्ट करणाऱ्यांची काही किंमत नाही आपल्याला. शहरं उभारणी आपण विसरलो आणि त्यामुळे आहे त्या परिस्थितीत त्यासाठी कष्ट करणाऱ्यांकडे आपली डोळेझाक होते. या अशा अनाम कष्टकऱ्यांना आदरांजली म्हणजे ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकाचं हे मुखपृष्ठ. चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चितारलेलं.

आता दिवाळीतल्या रोषणाईत छान वाटतील ही शहरं.

पण दिवाळी संपली की पुन्हा होती तशी होतील ती.

मेकअप पुसल्यानंतरच्या चेहऱ्यांसारखी.

पण आगामी वर्ष या शहरांच्या वेदना पुसणारे ठरो. शहरं सुधारली की खेडय़ांतही तो आनंद झिरपेल.

आपल्या बकालपणाचा विसर पाडणाऱ्या शुभेच्छांसह..

आपला..