करोनाची आपत्ती हीसुद्धा विविध क्षेत्रांसाठी संधी ठरत आहे. करोनाच्या निर्बंधांमुळे  लोक आपल्या परिसरात भटकं ती करू लागले असून त्यातून नवनवीन पर्यटनस्थळांचा शोध लागत आहे. त्यामुळे राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांसोबतच आता काही नवीन पर्यटनस्थळं पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉटेल व्यवसायाबरोबरच इतर सर्व संबंधित व्यवसांनी एकत्रित प्रयत्न के ल्यास पर्यटनाचा वेगाने विकास होईल. हॉटेल उद्योगाने मानसिकता बदलून सहल आयोजकांशी संवाद साधल्यास, हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना चांगले आदरातिथ्य दिल्यास त्याचाही पर्यटन आणि व्यवसायवाढीस लाभ होऊ शकतो. मात्र त्यासाठी आपली मानसिकता आणि व्यवस्था बदलण्याची गरज असून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षित के ले पाहिजे. हे सर्व घटल्यास गेल्या दीड वर्षापासून ठप्प असलेला हा व्यवसाय नक्कीच भरारी घेईल. विशाल कामत,  मुख्य कार्यकारी अधिकारी,  कामत हॉटेल्स समूह -राज्याच्या विकासात पर्यटन उद्योगाचे महत्त्वाचे योगदान – आदित्य ठाकरे</strong>

करोनाचे सावट कमी होऊ लागल्यावर आणि निर्बंध शिथील झाल्यावर गेली दीड वर्षे घरात राहिलेले नागरिक आता बाहेर पडत आहेत.  लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे व करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. आता नागरिक पर्यटनस्थळी व हॉटेलांमध्ये गर्दी करीत आहेत. महाराष्ट्रात बर्फ व वाळवंट नाही, पण तो सृष्टीवैभवाने नटलेला आहे. नद्या, तलाव, ताडोबा-पेंचसारख्या अभयारण्ये, अजिंठा व वेरुळ लेणी, लोणार आणि सृष्टीसौंदर्यांने नटलेल्या महाराष्ट्रात निसर्ग पर्यटनासाठी मोठ्या संधी आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचा वारशाचे दर्शन घडविणारे गड-किल्ले, प्राचीन व ऐतिहासिक स्थळे, धार्मिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, संत्री, स्ट्रॉबेरी, द्राक्ष बागांमध्ये कृषी पर्यटन अशा पर्यटनाच्या विविध अंगांचा विकास करण्यासाठी मोठा वाव आहे. छत्रपती शिवरायांनी अतिशय कमी कालावधीत केलेले कार्य थक्क करणारे आहे. या इतिहासाची ओळख पर्यटकांना करून देता येईल. डेक्कन ओडिसी रेल्वे गाडी ही महाराष्ट्राची शान आहे. कोकणात पावसाळ्यातील सृष्टीसौंदर्याचे पर्यटकांना मोठे आकर्षण आहे. पर्यटन म्हणजे केवळ एखादे स्थळ नसून तेथील नागरिक, त्यांची संस्कृती, वेशभूषा, भोजन किंवा वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ आदींचीही भुरळ पर्यटकांना पडते. अन्य राज्यांमधील व देशांमधील जे नागरिक मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी शहरांमध्ये व्यावसायिक कामांसाठी दोन-तीन दिवस येतात, त्यांनी आणखी काही दिवस राज्यात थांबून पर्यटनस्थळी भेट द्यावी, यादृष्टीने काही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पर्यटन स्थळी जाण्या-येण्याच्या सुविधा, तेथे राहण्यासाठी हॉटेल व अन्य सुविधा उभारणी, सुरक्षा आणि त्याची पर्यटकांपुढे मांडणी, या बाबींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे होते. करोना निर्बंधांमुळे सर्व व्यवहार ठप्प असताना पर्यटन क्षेत्रातील संबंधितांशी आम्ही सर्वंकष चर्चा केली आणि पुढील काळात हे क्षेत्र वेगाने कसे विस्तारता येईल, याचा विचार करून धोरणे आखली व हॉटेल व्यवसायाला उद्योगाचा दर्जा दिला. १९९९ पासून हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. तो प्रश्नही आता मार्गी लागला. पर्यटन व हॉटेल उद्योगांसाठी विविध  ८० परवाने व्यावसायिकांना प्राप्त करावे लागत असत. काही परवान्यांचे प्रयोजन काय, हे त्या खात्यांनाही माहीत नव्हते. त्यामुळे सेवा व सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता ७० परवाने कमी करून ही संख्या १० वर आणली आहे. त्याचा मोठा उपयोग पर्यटन व हॉटेल व्यावसायिकांना होणार आहे.

पर्यटन खात्यासाठी राज्य सरकारने १,२५० कोटी रुपयांची तरतूद केली. यापूर्वी एवढी तरतूद या विभागाला होत नसे. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने गेल्या काही महिन्यांमध्ये विविध उद्योगांशी सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. त्यापैकी ९० टक्के पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्मिती क्षेत्रात रोजगारवाढीला मर्यादा आहेत. मात्र पर्यटन क्षेत्रात रोजगारवाढीची मोठी संधी असून हे रोजगार स्थानिकांना मिळतील. पर्यटन वाढीतून हॉटेल व्यवसायात काम करणारे, पर्यटनस्थळी लहान-मोठा व्यवसाय करणारे, वाहनसुविधा, मार्गदर्शक, खाद्यपदार्थ व अन्य वस्तू विकणारे आदींना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने पर्यटन क्षेत्र हे इंजिन ठरू शकेल. या क्षेत्राचे मोठे योगदान राहील.

संत्री, द्राक्ष बागांमध्ये कृषी पर्यटन

 संत्री, द्राक्षे, स्ट्रॉबेरीच्या बागांमध्ये कृषी पर्यटन वाढीसाठी मोठा वाव आहे. त्याकडे लक्ष देण्यात येत आहे. नाशिक येथे बोट क्लब सुरू करण्यात आला असून गणपतीपुळे, नंदूरबार येथे नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  महाबळेश्वर, माथेरान येथील हॉटेल, दुकानदारांशी चर्चा झाली असून पर्यटक सुविधांसाठी आवश्यक बाबी, रस्ते रुंदीकरण प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. कृषी पर्यटन विस्तारण्यासाठी शेतकरी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही पुढाकार घेतला पाहिजे.

आरोग्य सुविधा उभारणार

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘वेलनेस टूरिझम’ला मोठा वाव आहे. समृद्धी महामार्गाजवळ २४ शहरे विकसित करण्यात येणार आहेत. त्यापैकी एखाद्या ठिकाणी आरोग्य केंद्र (हेल्थ हब) उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्या ठिकाणी स्पा, मसाज केंद्रे, आयुर्वेद चिकित्सा आदी सुविधा असतील. 

‘मुंबई २४ तास’ सुरू राहणे गरजेचे

जगातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील व्यवहार व जनजीवन २४ तास सुरू असते. मुंबईतील आठवड्याचे सर्व दिवस २४ तास सुरू राहणे गरजेचे आहे.     पंचतारांकित हॉटेल्समधील रेस्टॉरंटप्रमाणे अन्य हॉटेल्सही सुरू ठेवल्यास नागरिकांची सोय होईल आणि महसूलही वाढेल, असा विचार आहे.

’गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती, मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांना नावे दिलेल्या मान्यवरांचे कार्य याचे माहितीफलक त्या ठिकाणी प्रदर्शित करणार.

’ पर्यटन स्थळी मार्गदर्शकांच्या (गाइड्स) प्रशिक्षणास सुरुवात.

’ मुंबईतील वाहतूक सुविधा वाढविण्यासाठी (कनेक्टिव्हिटी) सागरी किनारा मार्ग, शिवडी-न्हावा पारबंदर रस्ता आदी प्रकल्पांची कामे सुरू आहेत.

’ इलेक्ट्रिक बसगाड्यांनंतर आता हायड्रोजन बसगाड्यांचा विचार सुरू आहे.

राज्य सरकारने पर्यटन उद्योगाला दिलासा दिला – पुनीत चटवाल

पर्यटन क्षेत्राकडे आतापर्यंत खूप दुर्लक्ष झाले. पण, करोनानंतर पर्यटन क्षेत्राकडे सर्वच स्तरांतून लक्ष दिले जात आहे. जागतिक उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा १० टक्के  इतका आहे. रोजगारातही तो १० टक्के  इतका आहे. भारतात तो ८ टक्क्यांच्या आसपास आहे. भारतात हे क्षेत्र असंघटित असल्याने ते कमी दिसते. भारतात येणारे पर्यटक, तिकीट विक्री लक्षात घेता पर्यटनाच्या क्षेत्रात भारत आठव्या स्थानावर आहे. टाळेबंदी उठल्यानंतर लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. हे सकारात्मक  आहे. अन्य देशांनी अजूनही पर्यटनाकरिता मुक्तपणे दरवाजे खुले के लेले नाहीत. याचा फायदा सध्या भारतातील पर्यटन क्षेत्राला होतो आहे. किं बहुना करोनापूर्व काळाच्या तुलनेत भारतात हे क्षेत्र वेगाने विकास करत आहे.  नेमक्या याच काळात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या क्षेत्राला हात दिला. महाराष्ट्रात पर्यटनाला उद्योगाचा दर्जा मिळाला. व्यवसाय सुरू करण्याकरिता लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करून तसेच अनेक करांत सवलती दिल्या. टाळेबंदीत शून्य उत्पन्न असताना हे क्षेत्र तग धरून राहिले. आता या क्षेत्राच्या उभारीचा काळ आहे. जेणेकरून देशाच्या उत्पन्नवाढीत हे क्षेत्र हातभार लावू शके ल. पर्यटन हे क्षेत्र के वळ उच्च वर्गाची मक्ते दारी नाही. या क्षेत्रातील ९० टक्के  सोयीसुविधा या सर्वसामान्यांकरिता आहेत. मुंबई येत्या काळात देशाच्या आर्थिक राजधानीबरोबरच पर्यटन राजधानी म्हणून नावारूपाला आली पाहिजे. पर्यावरणाचे भान राखून हे करता येणे शक्य आहे. आम्ही अंदमान-निकोबारमध्ये संपूर्णपणे प्लास्टिकमुक्त असे हॉटेल सुरू के ले आहे. हे इतरत्रही करता येईल. भविष्यातही करोनाची भीती असणारच आहे. या काळात सुरक्षित आणि जबाबदार पर्यटन हवे.  हा व्यवसाय विश्वासावर चालतो.  गेल्या दहा वर्षांतील प्रयत्नांमुळे करोनाकाळातही हा व्यवसाय टिकला.- पुनीत चटवाल,  व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी , इंडियन हॉटेल्स कं पनी लिमिटेड

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray new areas of tourism health facilities will be set up akp
First published on: 31-10-2021 at 00:06 IST